गांजा विक्रीचे शिरपूर ते मुंबई कनेक्शन; मढ आयलंडचा तरुण गजाआड

मुंबईच्या मढ आयलंड परिसरातील तरुणाला गांजा खरेदी करताना शिरपूर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली.
cannabis
cannabisesakal

शिरपूर (जि. धुळे) : रेव्ह पार्ट्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या मढ आयलंड परिसरातील तरुणाला गांजा (cannabis) खरेदी करताना शिरपूर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. गांजा विक्रेत्याच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

मंगळवारी (ता. २६) दुपारी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर गांजाची खरेदी-विक्री होणार असल्याची टीप शहर पोलिसांना मिळाली होती. निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह साध्या वेशातील पोलिसांचे पथक महामार्गावर उड्डाणपुलाखाली नजर ठेवून होते. दुपारी चारला दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांच्या संशयास्पद हालचाली पोलिसांनी टिपल्या. दुचाकीभोवती गराडा घालून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या झडतीत बॅगमध्ये दडवलेला दहा किलो ४२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. पोलिस ठाण्यात आणून दोघांची चौकशी करण्यात आली. गांजा खरेदी करणाऱ्याचे नाव लेस्टर अँथनी डिसूझा (वय ३७) असून, तो मुंबई येथील पश्चिम मालाड भागातील मढ आयलंडचा रहिवासी आहे. त्याला गांजा विकणाऱ्याचे नाव मिथुन जवल्या पावरा (वय २०, रा. उमर्दा ता. शिरपूर) आहे. संशयितांकडून गांजा, दुचाकी, दोन मोबाईल व दोन हजार रुपये रोख असा एकूण ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निरीक्षक रवींद्र देशमुख, सहाय्यक निरीक्षक गणेश फड, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, हवालदार नरेंद्र शिंदे, स्वप्नील बांगर, अमित रणमळे, भूषण कोळी आदींनी ही कारवाई केली.

cannabis
धुळ्यात 89 तलवारी, खंजीर जप्त; पोलिसांच्या सिनेस्टाइल कारवाईत चौघे गजाआड

शिरपूर ते मुंबई कनेक्शन

गांजा खरेदीसाठी मुंबई येथील अनेकजण शिरपूरला येत असल्याचे विविध कारवायांतून उघड झाले आहे. रेव्ह पार्टी, व्यसनाधीन युवक यांना गांजा उपलब्ध करून देणाऱ्यांच्या नेटवर्कमधील पुरवठादार शिरपूरमधील गांजा उत्पादक व दलाल यांच्या संपर्कात आहेत. येथून अत्यंत कमी किमतीत गांजा नेऊन मुंबईला महागड्या दरात विकला जातो. मढ आयलंड हा भाग मौजमजा, रेव्ह पार्टीसाठी ओळखला जातो. तेथील एजंट पोलिसांच्या ताब्यात आल्याने संपूर्ण साखळी गवसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

cannabis
अजय देवगणने चूक केलीच पण, जाणून घ्या हिंदी राष्ट्रभाषा का नाही झाली?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com