धुळे महापालिकेत शिवसेना ‘ॲक्शन मोड’मध्ये ! 

धुळे महापालिकेत शिवसेना ‘ॲक्शन मोड’मध्ये ! 

धुळे ः शहरातील देवपूर भागात सुरू असलेल्या रस्ते, गटाराच्या संथगतीच्या कामांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रश्‍न ‘सकाळ’ने पुन्हा एकदा मांडल्यानंतर त्याची दखल घेत शिवसेनेने याप्रश्‍नी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रश्‍नी महापालिकेतील सत्ताधारी भाजप व एमजेपीच्या अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी म्हटले आहे. 


शहरातील देवपूर भागात भुयारी गटार योजनेसह इतर कामे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. मात्र, कामांच्या संथगतीमुळे नागरिकही आता अशा योजना नसलेल्या बऱ्या, अशा प्रतिक्रिया व्यक्त करतात. शिवसेनेने याचा जाब विचारण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. 


शहरातील भूमिगत गटाराचे झालेले निकृष्ट काम, रस्त्यांची झालेली दुर्दशा यांसह पिण्याच्या पाण्याचे बिघडलेले नियोजन, स्वच्छतेकडे डोळेझाक आदी सर्व प्रश्‍नांवर महापालिकेतील सत्ताधारी भाजप व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरोधात येत्या आठवड्यात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. माळी यांनी सोमवारी दिला. महापालिकेतील सत्ताधारी भाजपने धुळेकर जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये, गैरफायदा घेऊ नये. कारण जवळजवळ १४२ किलोमीटर लांबीच्या भुयारी गटाराचे धुळे शहरात काम सुरू आहे. त्यासाठी रस्ते खोदल्यानंतर ते लगेच दुरुस्त केले पाहिजेत. मात्र, तसे होताना दिसत नाही. याबाबत कुठेही अधिकारी सुपरव्हिजन करताना फिरकत नाहीत, कुणाचाच कुणावर अंकुश नसल्याची स्थिती आहे. कुंपनच शेत खात आहे. त्यामुळे जनजागृतीची व जनतेच्या सहभागाची आवश्यकता आहे. 

खोदकामाच्या ठिकाणी आंदोलन 
शहरात ज्या- ज्या ठिकाणी रस्त्याचे खोदकाम झाल्यानंतर दुरुस्तीचे काम झालेले नाही, अशा ठिकाणी आंदोलन केले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com