Amnesty Scheme : थकबाकीदारांना अखेर 100 टक्के शास्ती माफी; आयुक्तांचा निर्णय!

Dhule municipal corporation news
Dhule municipal corporation newsesakal

धुळे : मालमत्ता कर भरण्याची इच्छा असूनही थोडाफार लाभ होईल या अपेक्षेने शास्तीमाफी योजनेची वाट पाहणाऱ्या थकबाकीदारांना अखेर महापालिकेकडून दिलासा मिळाला आहे.

अपेक्षेनुसार यंदाही महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारात मालमत्ता कर (Property Tax) थकबाकीवरील शास्ती (दंड) शंभर टक्के माफ करण्याचे जाहीर केले. (Municipal Commissioner has announced to waive 100 percent of penalty on property tax arrears under his authority dhule news)

६ ते ११ फेब्रुवारी असे सहा दिवसच या योजनेचा मात्र लाभ घेता येणार आहे. त्यामुळे या सहा दिवसांत किती थकबाकीदार या योजनेचा लाभ घेतात व यातून थकबाकीची डोकेदुखी किती कमी होते याकडे लक्ष असणार आहे.

मालमत्ता करापोटी शहरातील नागरिकांकडे महापालिकेचे तब्बल ८४ कोटी रुपये येणे होते. यात तब्बल ३२ कोटी रुपये निव्वळ शास्ती अर्थात मालमत्ता करावरील दंडाच्या रकमेचा समावेश होता. या ८४ कोटीपैकी जानेवारी २०२३ पर्यंत १८-१९ कोटी रुपये वसुली झाली, त्यामुळे सुमारे ६५ कोटी रुपये थकबाकी शिल्लक होती.

दरम्यानच्या काळात आणखी वसुली झाली. त्यानंतरही आजघडीला सुमारे ५० कोटी रुपये थकबाकी आहे. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून प्रयत्न करून, कारवाई करुरूनही अपेक्षेनुसार थकबाकी वसूल होत नसल्याचे चित्र आहे. अर्थात दर वर्षी असेच चित्र पाहायला मिळते.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

Dhule municipal corporation news
SAKAL EXCLUSIVE : सुरक्षित क्षेत्रात चार लाख विहिरी शक्य; भूजल सर्वेक्षणचा अहवाल

त्यातही ज्या थकबाकीदारांची थकबाकी भरण्याची इच्छा आहे त्यांनाही शास्तीमाफी मिळाली तर बरे होईल अशी अपेक्षा असते. यंदाही अशी अपेक्षा होती. अखेर महापालिका आयुक्तांनी त्यांना असलेल्या अधिकारात मालमत्ता कर थकीत रकमेवरील शास्तीमाफीची घोषणा केली.

सहा दिवस लाभ

आयुक्तांनी घोषित केलेल्या शास्तीमाफी योजनेनुसार थकबाकीदारांना शंभर टक्के शास्तीमाफी मिळणार आहे. या योजनेचा लाभ मात्र ६ ते ११ फेब्रुवारी अर्थात केवळ सहा दिवसच मिळणार आहे. यातही ६ ते १० फेब्रुवारीदरम्यान कराचा भरणा कार्यालयात येऊन धनादेशाद्वारे, तसेच धुळे मनपा प्रशासकीय कार्यालयात (नवीन इमारत) बँकेत रोख स्वरूपात भरता येईल.

११ फेब्रुवारीला धुळे जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मालमत्ता कर भरणा करण्याची व्यवस्था असेल. याशिवाय धुळे सिटिझन ॲपच्या माध्यमातूनही कर भरता येईल. महापालिकेचे कर्मचारी प्रत्यक्षदेखील वसुली करतील. त्यामुळे जास्तीत जास्त थकबाकीदारांनी कराचा भरणा करून शास्तीमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Dhule municipal corporation news
Dhule Maha Marathon : धुळेकरांमुळे मॅरेथॉन स्पर्धा Super Hit; विजेत्यांचा थाटात गौरव!

अटी-शर्ती

यापूर्वी शास्तीची सर्व रक्‍कम अदा केलेल्या मालमत्ताधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच योजनेंतर्गत कोणत्याही स्वरूपाचा परतावा दिला जाणार नाही, या योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा करणे आवश्यक राहील,

मालमत्ता करासंबधी न्यायालयात दावा प्रलंबित असल्यास प्रथमतः हा दावा न्यायालयातून काढून घेऊन त्याची कागदपत्रे सादर केल्यानंतर शास्तीमाफी योजनेचा लाभ घेता येईल, योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणताही वाद निर्माण झाल्यास त्याबाबत अंतिम निर्णय आयुक्तांचा राहील.

-एकूण थकबाकीदार.............२२००-२५००

-एक लाखावर थकबाकी असलेले.........४५०

-एकूण थकबाकी.....सुमारे ५०-५५ कोटी रुपये

Dhule municipal corporation news
Railway Update | नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे होणार : देवेंद्र फडणवीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com