esakal | धुळे मनपा देणार तुम्हाला घरबसल्या ‘बेड’ची माहिती 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे मनपा देणार तुम्हाला घरबसल्या ‘बेड’ची माहिती 

धुळे शहरावर भिस्त असताना महापालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि पथकांची नियुक्ती केली.

धुळे मनपा देणार तुम्हाला घरबसल्या ‘बेड’ची माहिती 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : कोरोनाबाधितांसह नातेवाइकांना बेड मिळविण्यासाठी शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. मात्र, महापालिकेने कोविड सहाय्यता कक्ष सुरू करून संबंधित रुग्ण, नातेवाइकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या कक्षाद्वारे 

आवर्जून वाचा- धुळ्यात ‘ते’ व्हेंटिलेटर सुरू होण्याची प्रतीक्षा; आरोग्यमंत्र्यांनी ‘सिव्हिल’ला दिलेली मुदत उलटली
 


मोबाईलवर घरबसल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती बेड शिल्लक आहेत, याची माहिती संबंधितांना मिळू शकेल. 
सहाय्यता कक्षाचे महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, स्थायी समितीचे सभापती संजय जाधव यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन झाले. शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आणि ग्रामीण व इतर शहरांची उपचारासाठी धुळे शहरावर भिस्त असताना महापालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि पथकांची नियुक्ती केली जात आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महापालिका हद्दीतील शासकीय, खासगी रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याची सूचना दिली होती. त्यानुसार आयुक्त शेख यांनी नियोजनातून महापालिकेच्या जुन्या प्रशासकीय इमारतीत कोविड सहाय्यता कक्षाची स्थापना केली. यात २४ तास रुग्णांना खासगी व शासकीय रुग्णालयातील सर्वसाधारण कक्ष, ऑक्सिजनयुक्त बेड, व्हेंटिलेटर बेडची माहिती मिळू शकेल. ही माहिती उपलब्धतेसाठी महापालिकेमार्फत अॅप विकसित केले जाणार आहे. खासगी तंत्र संस्थेने तशी कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे काही दिवसांत नागरिकांना घरबसल्या अॅपद्वारे बेडची माहिती मिळू शकेल. 


संपर्काचे आवाहन 
नागरिकांनी कोविड सहाय्यता कक्षाच्या ०२५६२-२८८३२० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले. कक्षाची आयुक्तांसह महापौर, सभापती, उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, डॉ. प्रशांत पाटील, प्रवीण अग्रवाल, गणेश जाधव, डॉ. जे. सी. पाटील आदींनी पाहणी केली. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image