महापालिकेत मानधनावर सत्तर पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

नाशिक - महापालिकेच्या वैद्यकीय विभागात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. मानधनावर रिक्त पदांची भरती केली जाणार असल्याने वैद्यकीय विभागावरचा कामाचा ताण हलका होईल. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. 
वेतनाचा खर्च केंद्र सरकारकडून केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या सहाय्याने मानधनावर का होईना भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाल्याने अन्य विभागांतही याच प्रकारे भरती करण्यासाठी नगरसेवक सरसावले आहेत.

महापालिकेचा आस्थापनेवरचा खर्च वाढत असल्याने राज्य शासनाने कायमस्वरूपी नोकरभरतीवर बंदी आणली आहे. त्याऐवजी आउटसोर्सिंगने भरती करण्यास मान्यता दिली आहे. आउटसोर्सिंगने भरती परवडणार नसल्याचे कारण देत नगरसेवकांकडून मानधनावरच्या भरतीची मागणी केली जात आहे. या वादात रिक्त पदांची भरती रखडली आहे. दर महिन्याला वीस ते पंचवीस जागा रिक्त होत आहेत.

जुन्या आकृतिबंधाप्रमाणे सात हजार दोनशे पदे मंजूर आहेत. सद्यस्थितीत सुमारे पाच हजार कर्मचारी शिल्लक आहेत. दरम्यान, वैद्यकीय विभागाला मानधनावर भरती करण्यास मान्यता मिळाली आहे. वैद्यकीय विभागातील ७० पदांची भरती केली जाईल. यात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, फार्मासिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर, लेखापाल, एएनएम, लॅब टेक्‍निशियन, शिपाई अशी पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांना १३ ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 

अशी आहेत पदे व संख्या
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी व अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी- प्रत्येकी सहा, डाटा एंट्री ऑपरेटर- आठ, लॅब टेक्‍निशियन- सहा, एएनएम- १५, फार्मासिस्ट- पाच, लेखापाल- एक, शिपाई- नऊ, परिचारिका- सात, इतर पदे- सात, एकूण - ७० पदे.

Web Title: Municipal hired to recruit seventy posts

टॅग्स