सुटीच्या दिवशीही मनपाच्या तिजोरीत ५७ लाख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

जळगाव - नोटीस मिळण्याआधी मालमत्ताकराचा भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना करात दहा टक्के सवलत (रिबेट) देण्यात येत असून, त्यास प्रतिसाद मिळत आहे. कर भरण्यासाठी रविवारीही प्रभाग समिती कार्यालये सुरू असून, रविवारी चारही प्रभाग समिती कार्यालयांमधून ५७ लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली. 

महापालिकेतर्फे मालमत्ताकर वसुलीची मोहीम यंदा प्रभावीपणे राबवली जात आहे. शनिवारपासून सलग चार दिवस शासकीय सुटी आल्यानंतरही महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर आकारणीसाठी सर्व चारही प्रभाग समिती कार्यालये सुरू ठेवली आहेत. मालमत्ता व पाणी कराची सूचना मिळण्याआधी कर भरल्यास मिळकतधारकास दहा टक्के सवलत देण्याची योजना मनपाने जाहीर केली असून या योजनेसही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, रविवारी चारही प्रभाग समिती कार्यालये दुपारी दोन वाजेपर्यंत कर भरणा करण्यासाठी सुरू होती. 

दिवसभरात असा झाला भरणा
आज दिवसभरात प्रभाग समिती कार्यालय क्रमांक एकमध्ये ३३ लाख ७१ हजार ५०८, प्रभाग समिती क्रमांक दोनमध्ये ३ लाख १ हजार, प्रभाग समिती क्रमांक तीनच्या कार्यालयात ११ लाख व प्रभाग समिती कार्यालय क्रमांक चारमध्ये १० लाख असे एकूण ५७ लाख ७२ हजार ५०८ रुपये कर भरणा जमा झाला आहे. सोमवारी बुद्धपौर्णिमेची सुटी असली तरी सकाळी १० ते २ यावेळेत कर भरणा सुरू राहणार आहे. 

Web Title: municipal safe property tax collection