टोमणा मारत असल्याने वहिनीला संपवले 

दीपक कच्छवा
रविवार, 8 जुलै 2018

असे होते खुनाचे कारण 
प्रियंकाचे लग्न 2013 मध्ये झाले. त्यानंतर दीर प्रवीण व प्रियंका हे बहीण भावासारखे राहायचे असे त्यांच्या कुटुंबातील सदस्य सांगत आहेत. प्रत्यक्षात, प्रियंका प्रवीणला पाहून नेहमी वाकडे तिकडे बोलायची. त्याला पाहून टोमणा मारायची. ज्यावेळी त्यांच्यात काही वाद झाले, तर प्रवीणची आई प्रवीणलाच बोलायची. लग्न झाल्यापासून ती नेहमी टोमणा मारून इतरांसमोर अपमान करीत असल्यानेच मी वहिनी प्रियंकाला संपवले, अशी रडत रडत कबुली प्रवीणने पोलिसांना दिली. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : "वहिनी सारखी सारखी टोमणा मारायची, कोणासमोरही अपमान करायची त्यामुळेच वहिनीचा जीव घेतला', अशी कबुली दीर प्रवीण याने पोलिसांना दिली. दरम्यान, या घटनेतील दोन्ही फरार महिलांना आज पोलिसांनी एकीला चिखली येथून, तर दुसरीला चाळीसगावमधून अटक केली. 

कुंझर (ता. चाळीसगाव) येथील विवाहिता प्रियंका रामचरण बैरागी (वय 27) हिने 4 जुलैला सकाळी सातच्यापूर्वी सासरी कुंझरला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी अवघ्या तीनच तासात संशयित आरोपी प्रवीण बैरागीने पोलिसांना खुनाची कबुली दिली. मात्र, त्याने खून का केला हे पोलिसांना सांगितलेले नव्हते. 

असे होते खुनाचे कारण 
प्रियंकाचे लग्न 2013 मध्ये झाले. त्यानंतर दीर प्रवीण व प्रियंका हे बहीण भावासारखे राहायचे असे त्यांच्या कुटुंबातील सदस्य सांगत आहेत. प्रत्यक्षात, प्रियंका प्रवीणला पाहून नेहमी वाकडे तिकडे बोलायची. त्याला पाहून टोमणा मारायची. ज्यावेळी त्यांच्यात काही वाद झाले, तर प्रवीणची आई प्रवीणलाच बोलायची. लग्न झाल्यापासून ती नेहमी टोमणा मारून इतरांसमोर अपमान करीत असल्यानेच मी वहिनी प्रियंकाला संपवले, अशी रडत रडत कबुली प्रवीणने पोलिसांना दिली. 

संशयित जाळ्यात
प्रियंकाच्या मृत्यूनंतर तिची सासू लीलाबाई बैरागी व आजेसासू सुमनबाई बैरागी (सासूची आई, रा. चिंचगव्हाण) या दोघींनाही प्रियकांच्या अंत्यविधीच्या दिवशी प्रियंकाच्या माहेरच्या लोकांनी मारले होते. तेव्हापासून त्या दोघेही फरार होत्या. घटनेचे तपासाधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी तपासाची चक्रे फिरवली. प्रियंकाची सासू लीलाबाई बैरागी हिला चाळीसगावातून तर आजेसासू सुमनबाई बैरागी हिला चिखली (ता. बुलडाणा) येथून ताब्यात घेतले. 

जिल्हा कारागृहात रवानगी
प्रियंकाच्या खूनप्रकरणी तिचा दीर प्रवीण बैरागी याची पोलिस कोठडी संपल्याने त्याला चाळीसगाव न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने पोलिस तपासात खुनाची कबुली दिल्याने न्यायालयाने त्याची जिल्हा कारागृहात जळगावला रवानगी केली आहे, अशी माहिती दिलीप शिरसाठ यांनी दिली.

Web Title: murder case in Chalisgaon