नांदगाव कोहलीतील खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

नाशिक - नांदगाव कोहलीपैकी खुटपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे दिवाळीच्या वेळी झालेल्या भांडणाची कुरापत काढून एकाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी दोघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी जन्मठेप, तसेच सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणी आरोपी रामदास आहेर याच्या पत्नीची साक्ष, तसेच मोबाईलचा तांत्रिक माहितीचा पुरावा महत्त्वाचा ठरला. मृत सुभाष काळू गावित याचे आरोपी रामदास आहेर व दशरथ जाधव यांच्याशी भांडण झाले होते. या भांडणातून गावितचा खून करण्यात आला होता.
Web Title: murder case two accused Life imprisonment crime punishment