विवाहितेचा विष देऊन खून; जळगाव बुद्रुक गावातली घटना 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

नांदगाव : विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला विषारी औषध पाजून खून केल्याप्रकरणी पती दीर सासू सासरे अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत पोलिसांनी अटक केली.

दरम्यान मयत विवाहितेच्या पार्थिवावर पोलीस बंदोबस्तात जळगाव बुद्रुक येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले ज्योती सुनील थोरे (वय २८) असे मयत विवाहितेच नाव असून तिला दोन मुले आहेत.

कन्नड तालुक्यातील वासडी येथील सुधाकर नारायण मुगले यांच्या मुलीचा दहा वर्षांपूर्वी जळगाव बुद्रुक येथील सुनील काशिनाथ थोरे यांच्याशी झाला होता लग्न झाल्यापासून आपल्या मुलीला माहेरून धरणातील पाईप लाईन साठी अडीच लाख रुपये आणावेत तसेच जमीन लेव्हलिंगसाठी एक लाख रुपये आणावेत यासाठी वेळोवेळी शाररिक मानसिक छळ करून मारहाण केली जात होती व पती सुनील हा पत्नी ज्योती हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे.

बुधवारी ज्योती माहेरहून सासरी जळगाव बुद्रुकला आली असता सांयकाळी सात वाजता तिला मारहाण करून तिच्या तोंडात बळजबरीने विष टाकून खून केल्याची फिर्याद वडील सुधाकर यांनी पोलिसात दिली वडिलांच्या फिर्यादीवरून पती सुनील,दीर दीपक,सासरे काशिनाथ व सासू मीराबाई थोरे यांच्याविरुद्ध संगनमताने मारहाण करीत व विष पाजून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेत्तले विवाहितेच्या मृत्यू नंतर जळगाव बुद्रुक गावात तणाव निर्माण होऊ नये यासाठी सतर्कता बाळगत अंत्यविधी वेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी जळगाव बुद्रुक येथे भेट देत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला होता पोलीस उपनिरीक्षक बी यु पदमणे हवालदार एस के बोगीर पुढील तपस करीत आहेत.

Web Title: Murder in Jalgaon Budruk, husband booked