तरुणाच्या पित्याचा प्रेम प्रकरणातून खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पिंपळनेर - प्रेम प्रकरणातून मुलीच्या वडिलांनी तरुणाच्या वडिलांचा दगडी जात्यावर आपटून खून केल्याची घटना काल (ता. २४) रात्री घडली. पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितास अटक झाली. त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

मळगाव (ता. साक्री) येथील अक्काबाई बुधा पवार (वय ४०) यांचा मुलगा अनिल याचे सावरपाडा (जि. अहवा, गुजरात) येथील रामचंद्र तुळशीराम गावित (वय ३५) याची मुलगी सेजल हिच्याशी प्रेमसंबंध आहेत. 

प्रेमसंबंधातून अनिलने सेजलला त्याच्या घरी नेले. त्यामुळे संतप्त झालेल्या रामचंद्र गावित हे अक्काबाई यांच्या घरी आला. त्याने अक्काबाईच्या कुटुंबीयांशी वाद घातला. त्या वेळी अक्काबाईचे पती बुधा सीताराम पवार (वय ४५) यांनी धाव घेत मध्यस्थी केली. त्यावरून गावितने बुधा पवार यांना बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता जवळच असलेल्या दगडी जात्यावर आपटले. त्यात डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन ते खाली पडले. त्यांना अक्काबाई यांनी सासरे सीताराम पवार, मुलगा अनिल, सेजल यांनी पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्‍टरांनी बुधा पवार यांना मृत घोषित केले. अक्काबाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावित याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. संशयित रामचंद्रला आज पहाटे साडेतीनच्या सुमारास अटक केली असून, तपास सुरू आहे.

Web Title: Murder in Love Case Crime