PHOTOS : "ती' विवाहित..अन् तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान प्रियकराच्या प्रेमात पडली..पण...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

 "ती' विवाहित, तरीही ती तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराच्या प्रेमात पडली. "ती' तीन महिन्यांची गरोदर असताना त्याने तिला मोबाईलवर बोलताना पाहिले. संशयाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसले. त्या संशयानेच तिचा बळी घेतला. घोटी पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून बळी घेणारा प्रियकर व त्याला साथ देणारा काका (चुलता) सुटला नाही. खुनानंतर अवघ्या पाच तासांत ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. 

नाशिक :  "ती' विवाहित, तरीही ती तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराच्या प्रेमात पडली. "ती' तीन महिन्यांची गरोदर असताना त्याने तिला मोबाईलवर बोलताना पाहिले. संशयाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसले. त्या संशयानेच तिचा बळी घेतला. घोटी पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून बळी घेणारा प्रियकर व त्याला साथ देणारा काका (चुलता) सुटला नाही. खुनानंतर अवघ्या पाच तासांत ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. 

Image may contain: 1 person, closeup

अशी घडली खळबळजनक घटना.....

या खळबळजनक घटनेची माहिती अशी, की काळुस्ते ग्रामपंचायत हद्दीतील फोडसेवाडी येथील कविता सनू पारधी (वय 23) हिचे गावातील दीपक चिमा गिरे (21) याच्याशी प्रेमसंबंध जुळले होते. पाच वर्षांपासून दोघांचे संबंध होते. ती कोणाशी तरी आपल्याव्यतिरिक्त बोलत असल्याने त्याने तिला विचारले. मात्र, तिने म्हटले, "माझ्याशी लग्न कर. मग मी सांगेन.' त्यानंतर त्याने तिला भाम धरणावर नेत तिला समजाविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी राग अनावर झाला, त्याने 13 नोव्हेंबरच्या रात्री अकराला दगडावर डोके आपटून तिला ठार केले. कविता मरण पावल्यावर त्याने आपले काका पुना सोमा गिरे यांना कळविले. दोघांनी तिला दरीत फेकून पोबारा केला. 

Image may contain: 1 person, standing, outdoor and nature

घोटी पोलिसांनी लावला पाच तासांत छडा...

कविताच्या नातेवाइकांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दिली. तिचा शोध सुरू असताना घोटी पोलिस ठाण्यात रविवारी (ता. 24) दुपारी तीनला एका गुराख्याकडून माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक आनंदा माळी यांनी कुजलेल्या कपड्यांची परिसरात माहिती घेतली. ती कविताच असल्याचे समजले. त्यांना दीपक गिरे याच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांनी त्यास पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. पुरावे गोळा करून काका पुना सोमा गिरे (वय 39) याने मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक केली. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी भेट दिली. हवालदार धर्मराज पारधी, लहू सानप, शीतल गायकवाड, विक्रम झाल्टे, भास्कर महाले, नितीन भालेराव यांनी शोध घेऊन तपासाला गती दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of Married Woman by her Boyfriend Nashik Crime News Marathi News