तरुणाची निघृणपणे हत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

डोंगरकठोरा गावाकडून वड्रीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला शरीफचा मृतदेह शेतमजुरांना आढळल्याने त्यांनी यावल पोलिसात याबाबत माहिती दिली. यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत पंचनामा सुरु केला आहे.

यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा गावातील एका सतरा वर्षीय तरुणाचा चाकूने गळा कापून, व दगडाने ठेचून निघृणपणे खून करण्यात आल्याची घटना आज (ता.३) पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. शरीफ मेहरबान तडवी (वय १७ ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शेतमजूर असलेल्या तरुणाचा खुन नेमका कोणी व का केला याचे कारण अद्याप उघडकीस आले नसले तरी या खुनाविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.

डोंगरकठोरा गावाकडून वड्रीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला शरीफचा मृतदेह शेतमजुरांना आढळल्याने त्यांनी यावल पोलिसात याबाबत माहिती दिली. यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत तरुणाच्या पश्चात आई,वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत पंचनामा सुरु केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder of young boy in yaval