केरळच्या मदतीसाठी मुस्लिम बांधवानी जमा केला निधी

दिगंबर पाटोळे
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

वणी (नाशिक) : बकरी ईदच्या नमाज पठणानंतर केरळच्या मदतीसाठी मुस्लिम बांधवानी जमा केला निधी.'देवभूमी' केरळ राज्यात कोसळलेल्या पावसानं आणि बेभान पुरानं तिथल सारं उजाड झालं. या नैसर्गिक आपत्तींत झालेले प्रचंड नुकसान पाहता 'सकाळ रिलीफ फंडा' तर्फे मदतीचे आवाहन करण्यात आले होते.

बकरी ईद सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असतांना वणी व पंचक्रोशीतील मुस्लिम बांधवांनी व चिमुरड्यांनी वणी येथील जामा व मदिना मस्जिद येथे नमाज अदा केल्यानंतर केरळच्या जनतेसाठी दुआ मागत मुस्लिम बांधवानी स्वयंम इच्छेने पैसे जमा करीत अकरा हजारांचा निधी 'सकाळ रिलीफ फंडासाठी' जमा केला आहे. या निधीत चिमुरड्यांनीही बकरी ईद साठी मिळालेले खाऊचे पैसे निधीत जमा केले. 
 
Web Title: Muslim brothers funded for Kerala help