मुस्लिम बांधवाने लग्नाच्या पत्रिकेतून जोपासला सामाजिक सलोखा

दिगंबर पाटोळे
शनिवार, 5 मे 2018

वणी - येथील मुस्लिम बांधवाने आपला मुलीची लग्न पत्रिका हिंदु पध्दतीने छापून सामाजिक ऐक्याचा संदेश देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

वणी - येथील मुस्लिम बांधवाने आपला मुलीची लग्न पत्रिका हिंदु पध्दतीने छापून सामाजिक ऐक्याचा संदेश देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

दोन समाजात, धर्मात धर्मांध वेडी लोक समाज व धर्माच्या नावाखील फुट पाडण्याचा प्रयत्न करत असतात. पण समाजात काही माणस अशी आहेत की ज्यांना माणुस व माणूसकी धर्मापेक्षा जास्त मोठी वाटते. असेच प्रकारचे चित्र वणी येथे सर्व धर्मियांमध्ये बघावयास मिळेते. छत्रपती शिवाजी महाराज जंयती, डॉ. आंबेडकर जयंती, रमजान ईद, बकरी ईद, भगवान महावीर जयंती, श्री रामनवमी पालखी सोहळा, दिवाळी, दसरा, भगवान बीरसा मुंडा जंयती आदी सर्व सण, समारंभ, जयंती उत्सवात येथील सर्वधर्मीय व पक्षीय कार्यकर्ते हिरारीने सहभाग घेवून एकमेकांचे स्वागत करुन शुभेच्छा देतात. 

त्यामुळे आता पर्यंत वणी गावात अद्याप सामाजिक सलोखा बिघडेल अशा कुठल्याही प्रकारच्या घटनेची नोंद झालेली नाही. अशातच येथील बांधकाम साहित्याचा पुरवठा करण्याचा व्यवसाय करणारे राजू सैय्यद यांनी आपली कन्या आरबीना (मुस्कान) हीच्या विवाहाची लग्न पत्रिका ही हिंदू पध्द्तीने छापली आहे. वघई येथील रज्जाक शेख यांच्या मुलगा रियाज यांच्यांशी वणी येथे रविवारी, ता. ६ रोजी होणाऱ्या या विवाहाच्या पत्रिकेवर राजू सैय्यद यांनी श्री गणेशाचा फोटो छापला आहे. हिंदूंमध्ये कोणत्याही शूभकार्याच्या सुरूवातीला गणपतीची पुजा करण्याची पद्धत आहे. यामुळे कोणतेही काम निर्विघ्न पार पडते, असा हिंदूंचा विश्वास आहे. तसेच महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी माता व अराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महारांजा फोटोही पत्रिकेवर छापण्यात आला आहे. 

तसेच पत्रिकेवर पंचागानूसार लग्न विधी, तिथी, शुभ मुहूर्ताचाही उल्लेख करुन आपल्या स्नेही, मित्र परीवरांस सहकुटुंब लग्नासाठी आमंत्रित केले आहॆ. एवढेच नव्हे तर पत्रिकेत कुटुंबातील सदस्यां बरोबरच प्रेषक, कार्यवाहक, व्यवस्थापक, संयोजक, सहकार्य आदीमध्ये गावातील सर्व जाती धर्मातील मित्र परीवारातील व्यक्तींचे नावे टाकण्यात आली आहे. राजू सैय्यद यांच्या या कृतीने सामाजिक ऐक्याचे एक उत्तम उदारहणच समाजात प्रस्थापित केले आहे.

Web Title: Muslim family prints special cards for Hindu marriage invitees