तीन तलाक बिलच्या विरोधात मुस्लिम महिलांचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

केंद्र शासनाने तीन तलाक कायदा हा त्वरीत मागे घ्या! या मागणीसाठी आज जळगाव शहरासह तालुक्‍यातून आज मुस्लीम महिलांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढून ट्रिपल तलाक कायद्याच्या विरोधात एल्गार केला.

जळगाव जामोद (बुलडाणा) - 'ट्रिपल तलाक' हा मुस्लिम समाजातील मोठा प्रश्‍न नाही. मात्र राज्यकर्ते त्याला मोठा प्रश्‍न मानून देशाला वेगळ्या मुद्यांमध्ये गुंतवून मुस्लिम समाजात फुट पाडत आहे. भारतीय घटनेने आम्हाला ते स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने तीन तलाक कायदा हा त्वरीत मागे घ्या! या मागणीसाठी आज जळगाव शहरासह तालुक्‍यातून आज मुस्लीम महिलांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढून ट्रिपल तलाक कायद्याच्या विरोधात एल्गार केला. मोर्चात महिलांच्या हाती विविध घोषणांचे फलक हे सर्वांचे लक्ष वेधत होते. 

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांच्यातर्फे आज 'ट्रीपल तलाक' कायद्याच्या विरोधात महिलांचा मुक मोर्चाचे आयोजन केले होते. सकाळी 12 वाजता मोर्चा काजी पुरा चावळी व दुर्गा चौकातून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात दोन हजारच्या जवळ मुस्लिम महिलांनी सहभाग घेतला. अकोल्याहून आलेले महेजबीन, यासमीन जाहां व जळगावचे तीन असे पाच जणांचे महिला शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांना 'ट्रिपल तलाक' कायदा विरोध, राष्ट्रपतींनी लोकसभेत केलेल्या भाषणात मुस्लिम महिला यांच्याविषयी केलेले उच्चारले उद्‌गाराबद्दल निषेध, केंद्राकडून हे बिल लादून मुस्लिम समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न केला जात असून या कायद्याला विरोध असून हा कायदा रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन दिले. 

यावेळी मौलाना खलीलुरहेमान नदवी, डॉ. शाकीर खान, मुफती शोएब कासमी, मौलाना ईरफान, हाफीज़ ईसमाईल, हाफीज़ नसीम, जामा मशीदचे सदर जियाउलला खान, मुश्ताक जमदार, शे लाल जमदार, परवेज़ जमदार, खलील जमदार, आज़म कुरेशी, शाहिद कुरेशी, सै बाहोदीन, समीर आर्यन, अॅड. करीम खान, अॅड. ईरफान, आसिफ ईकबाल, अबरार साहेब, ईरफान भाई, अफसर भाई, शे ज़हीर, तंजीर जमदार, एजाज़ देशमुख, फीरोज़ के जी एन, ईशतीयाक देशमुख,  नदीम भाई व सर्व ईमाम आणि इतर मुस्लिम बांधव हजर होते.

Web Title: Muslim women's front against three divorce bills