मुस्लिम तरुणांकडून हिंदू युवकावर विधीवत अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

बिहारमधील विद्रोही या गावातील हिमांशू कुमार मण्डल हा 19 वर्षीय युवक गेल्या काही दिवसांपासून येथील सार्वजनिक शौचालयात काम करीत होता. त्याचे कुटुंबीय नाशिक येथे वास्तव्यास आहेत आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय असल्याने हा युवक बाहेर पुरा भागातील कुरबान नगरातील सार्वजनिक शौचालयात आडोशाला रात्र काढून मिळेल ते खाऊन आपला चरितार्थ चालवत होता.

पाचोरा : अलीकडच्या काळात किरकोळ जातीय व धार्मिक मतभेदातून अनेक ठिकाणी जातीय दंगलींचा उद्रेक झाल्याचे आपण पाहतो, अथवा ऐकतो परंतु पाचोरा येथील मुस्लिम तरुणांनी मात्र जातीय धार्मिक एकतेचा आगळावेगळा संदेश द्विगुणित केला आहे. येथे वास्तव्यास असलेल्या बिहारच्या मृत युवकावर मुस्लिम तरुणांनी स्वतः पैसे खर्च करून हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे अंत्यविधी केला आहे व पुढील सर्व विधी करण्याचा निर्धारही या तरूणांनी केल्याने या मुस्लिम बांधवांच्या मानवतेला पाचोरावासीयांनी सलाम केला आहे.

बिहारमधील विद्रोही या गावातील हिमांशू कुमार मण्डल हा 19 वर्षीय युवक गेल्या काही दिवसांपासून येथील सार्वजनिक शौचालयात काम करीत होता. त्याचे कुटुंबीय नाशिक येथे वास्तव्यास आहेत आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय असल्याने हा युवक बाहेर पुरा भागातील कुरबान नगरातील सार्वजनिक शौचालयात आडोशाला रात्र काढून मिळेल ते खाऊन आपला चरितार्थ चालवत होता. शनिवारी त्याचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कुरबान नगरमधील मुस्लिम तरूण एकत्रित आले व त्यांनी मयत हिमांशूकुमारचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणून सर्व सोपस्कार पूर्ण करून मृतदेह ताब्यात घेतला. त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला परंतु ते येण्यास वेळ होणार असल्याने या मुस्लिम तरुणांनी मयत युवकाच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी पूर्ण केली. स्वतः पैसे एकत्रित करून हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे या युवकावर अंत्यसंस्काराचे नियोजन केले. यात सय्यद नूर, लतीफ मिस्तरी यांनी अंत्ययात्रेत आग्या होऊन अमर धामा पर्यंत अंत्ययात्रा नेली व तेथे सुमारे तासभर मयत युवकांच्या कुटुंबीयांसाठी अंत्यविधी थांबवून ठेवला.

मयत युवकाचा भाऊ व आई अमरधामात पोहोचल्यानंतर या तरुणावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लतीफ मिस्तरी सैय्यद नुर शहीद मिस्तरी सैय्यद तारिक सादिक भाई रफिक बागवान इरफान अली सलीम शाह अपना  टेलर यांचेसह सुमारे दोनशे मुस्लिम तरुण या अंत्ययात्रेत सहभागी झाले. हिंदू धर्मशास्त्रानुसार अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर मयत बिहारी युवकांच्या नातलगांनी या मुस्लिम तरुणांना झालेला खर्च देण्याचा विचार मांडला. परंतु तो खर्च घेण्यास मुस्लिम तरुणांनी नकार देऊन उलट पुढील सर्व विधीही करण्याची तयारी दर्शवली. मुस्लिम युवकांच्या या मानवतावादी कार्याचे सर्व थरातून कौतुक होत असून या मुस्लिम तरुणांच्या मानवतेला पाचोरा वाशीम सलाम करीत आहेत.

Web Title: muslim youth cremation on hindu in Pachora