मुस्लीम बांधवांकडून अल्लाहला पावसासाठी साकडे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

महिनाभर रोजे अर्थात उपवास केल्यानंतर काल शुक्रवार (ता.१६) रोजी चंद्रदर्शन झाल्याने शहरातील जामा अशीद परिसरात फटाक्यांची आतषबाजी करून ईदचा आनंद साजरा करण्यात आला. आज सकाळी दहाला येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाजपठण केले. ईदच्या नमाज नंतर मुस्लिम समाजातील बंधुभावांनी एकमेकांची गळा भेट करून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वधर्मीय बांधवही शुभेच्छा देण्यासाठी याठिकाणी उपस्थित होते. 

सटाणा : सटाणा शहर व तालुक्यात आज शनिवार (ता.१६) रोजी अभूतपूर्व उत्साह व जल्लोषात ईद साजरी करण्यात आली. विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम समाजबांधवांनी सामुदायिक नमाज पठन केले. शहर व तालुक्यात पावसाने पाठ फिरवली असून सर्वत्र जोरदार पाऊस पडावा आणि पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी मुस्लीम बांधवांकडून अल्लाहला साकडे घालण्यात आले. जामा मशिदीचे शाही इमाम मौलाना हाजीमोद्दीन नूरी यांचा ईदनिमित्त लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विविध पक्ष - संघटनांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सत्कार करून ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

महिनाभर रोजे अर्थात उपवास केल्यानंतर काल शुक्रवार (ता.१६) रोजी चंद्रदर्शन झाल्याने शहरातील जामा अशीद परिसरात फटाक्यांची आतषबाजी करून ईदचा आनंद साजरा करण्यात आला. आज सकाळी दहाला येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाजपठण केले. ईदच्या नमाज नंतर मुस्लिम समाजातील बंधुभावांनी एकमेकांची गळा भेट करून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वधर्मीय बांधवही शुभेच्छा देण्यासाठी याठिकाणी उपस्थित होते. 

बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, नगराध्यक्ष सुनिल मोरे, उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार जितेंद्र कुवर, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते नितीन सोनवणे, भाजपचे गटनेते महेश देवरे, नगरसेवक राहुल पाटील, दीपक पाकळे, भारत खैरनार, पंडितराव अहिरे, छोटू सोनवणे, रत्नाकर सोनवणे, दत्तू बैताडे, नाना मोरकर, शाम बागडणे, प्रकाश बच्छाव, दिलीप सोनवणे, शाम बागडणे, पावन सांगळे, वसंत बागडणे,शाहीर भीमराव पवार, आरपीआयचे तालुकाध्यक्ष भारत बच्छाव, किशोर ह्याळीज, मुस्लिम पंच कमिटीचे सरपंच अल्ताफ मुल्ला, उपसरपंच नईम शेख, शाबीर तांबोळी, बाबूभाई शेख, मुन्ना रब्बानी, फईम शेख, सिराज मुल्ला, सलीम मन्सूरी, शफीक मुल्ला, फारुख तांबोळी, असलम मन्सूरी, सलीम पठाण, अशपाक मन्सूरी आदींसह शहर व तालुक्यातील हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. नईम शेख यांनी प्रास्तविक केले.

Web Title: Muslims are to pray for Allah to rain