मुथूट फायनान्स दरोडा; ऑडिटरच्या मारेकऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

मुथूट फायनान्स कार्यालयावरील दरोडा अन्‌ सॅम्युअल हत्येच्या गुन्ह्याची उकल होऊ लागली असून, या दरोड्याच्या कटाचे धागेदोरे सुवर्ण कर्ज देणाऱ्या वित्त संस्थांच्या कार्यालयांवर दरोडे टाकणाऱ्या सुबोध सिंह याच्यापर्यंत पोचले आहेत. ‘मुथूट’च्या गुन्ह्यात आज दुसरा संशयित परमेंदर राजेंद्रसिंग यास वडोदरा (सुरत) येथून अटक करण्यात आली आहे. ऑडिटर सॅम्युअल यांच्यावर तीन गोळ्या झाडून त्यांचा खून केल्याची कबुली परमेंदर याने पोलिसांना दिली आहे.

नाशिक - मुथूट फायनान्स कार्यालयावरील दरोडा अन्‌ सॅम्युअल हत्येच्या गुन्ह्याची उकल होऊ लागली असून, या दरोड्याच्या कटाचे धागेदोरे सुवर्ण कर्ज देणाऱ्या वित्त संस्थांच्या कार्यालयांवर दरोडे टाकणाऱ्या सुबोध सिंह याच्यापर्यंत पोचले आहेत. ‘मुथूट’च्या गुन्ह्यात आज दुसरा संशयित परमेंदर राजेंद्रसिंग यास वडोदरा (सुरत) येथून अटक करण्यात आली आहे. ऑडिटर सॅम्युअल यांच्यावर तीन गोळ्या झाडून त्यांचा खून केल्याची कबुली परमेंदर याने पोलिसांना दिली आहे. 

अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीमध्ये कौशल्याने तपास करणाऱ्या गुन्हे शाखेला पोलिस आयुक्‍तांनी दोन लाख १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. या तपास पथकाने ही रक्कम या घटनेत दरोडेखोरांशी दोन हात करताना स्वत:चा जीव गमवावा लागलेल्या संजू सॅम्युअल यांच्या कुटुंबीयांना देण्याचे जाहीर केले आहे. परमेंदर सिंग यास न्यायालयाने येत्या ३ जुलैपर्यंत ८ दिवसांची पोलिस कोठडी 
दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muthoot Finance Robbery Murderer Arrested Crime