मुथूट फायनान्स दरोडा; एक संशयित गुजरातमधून ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

मुथूट फायनान्स दरोडाप्रकरणी सहा दिवसांनंतर एकाला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. सशस्त्र दरोड्याच्या घटनेतील संशयित हे उत्तर प्रदेश व बिहारमधील असण्याची प्राथमिक माहिती असून, नाशिकमधील सराईत गुन्हेगारांचे त्यांना पाठबळ मिळाल्याचीही चर्चा आहे.

नाशिक - मुथूट फायनान्स दरोडाप्रकरणी सहा दिवसांनंतर एकाला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. सशस्त्र दरोड्याच्या घटनेतील संशयित हे उत्तर प्रदेश व बिहारमधील असण्याची प्राथमिक माहिती असून, नाशिकमधील सराईत गुन्हेगारांचे त्यांना पाठबळ मिळाल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्ह्याचा तपास सकारात्मक असल्याचा दावा पोलिस आयुक्तांनी केला आहे.

उंटवाडी रस्त्यावरील मुथूट फायनान्स कार्यालयावर गेल्या शुक्रवारी (ता. 14) चौघांनी सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न केला. त्या वेळी संशयितांनी केलेल्या गोळीबारात ऑडिटर एम. सॅजू सॅम्युअल यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांची सुमारे 12 ते 15 तपास पथके राज्यासह गुजरात, मध्य प्रदेशात रवाना केली होती. युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुजरातमधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. संशयितांनी दरोडा टाकण्यापूर्वी मुथूट फायनान्सची रेकी केली होती. यादरम्यान संशयित हे सिडकोत वास्तव्याला असल्याचेही समोर येते आहे. परंतु, तपास सुरू असल्याने पोलिसांकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muthoot finance Robbery Suspected Arrested Crime