ज्येष्ठ नेते आव्हाड यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

नाशिक - जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती, क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष निवृत्ती महादेव तथा एन. एम. आव्हाड (वय 79) यांचे मंगळवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

"एन. एम.' या नावाने ते जिल्ह्यात परिचित होते. व्यवसायाने ते स्थापत्य अभियंता होते. त्यांनी साहित्य, राजकारण, समाजकारण, भूगर्भशास्त्र अशा विविध क्षेत्रांत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. एन. एम. यांचे जन्मगाव ठाणगाव (ता. सिन्नर) आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. लातूर व कोयना भागातील भूकंपानंतर त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे.

Web Title: N. M. Avad Death