अनुदानित खते विक्रीमुळे गैरप्रकारांना बसणार आळा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

नाशिक : येत्या 1 डिसेंबरपासून नाशिकमध्ये शेतकऱ्यांना रासायनिक अनुदानित खते विक्रीसाठी ई-पोस ही पद्धत अवलंबविण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारकार्डाची नोंदणी करून त्यानुसार विक्री करावी लागणार आहे. विक्रेत्यांनी ही नवीन पद्धत आत्मसात करून शेतकऱ्यांना नव्या पद्धतीनुसार खते विक्री करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे आज करण्यात आले. कृषिथॉन प्रदर्शनाचा उद्या (ता. 27) समारोप होणार आहे.

कृषिथॉन प्रदर्शनात नाडातर्फे कृषी विक्रेत्यांच्या कार्यशाळेत कृषी सहसंचालक कैलास मोते, कृषी विकास अधिकारी हेमंत काळे यांनी विक्रेत्यांना अनुदानित खते विक्रीच्या पद्धतीची माहिती दिली. हेमंत काळे म्हणाले, ""आतापर्यंत एक हजार 400 यंत्र विक्रेत्यांना दिले आहेत. ही यंत्रे हाताळण्यासाठी अत्यंत सोपी आहेत. विक्रेत्यांनी आपापल्या भागातील शेतकऱ्यांची माहिती या मशीनमध्ये नोंद करून घ्यावी.''

कैलास मोते यांनी, कृषी विक्रेत्यांच्या जबाबदाऱ्या व भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी कृषिथॉनचे आयोजक संजय न्याहारकर, नाडाचे अध्यक्ष विजूनाना पाटील, भगवान खैरनार आदी उपस्थित होते.

संरक्षित शेती करा : बोडके
बदललेले वातावरण व नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होते. त्यामुळे संरक्षित शेतीची कास धरल्यास दर्जेदार उत्पन्न मिळण्याबरोबरच नुकसान टाळता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी संरक्षित शेती करावी, असे आवाहन अभिनव फार्मर क्‍लबचे ज्ञानेश्‍वर बोडके यांनी केले. कृषिथॉनमध्ये भाजीपाला लागवडबाबत झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी केळकर संस्थेचे अध्यक्ष बर्वे उपस्थित होते. योगेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

सुटीमुळे प्रदर्शनास गर्दी
कृषिथॉन प्रदर्शनास आज चौथ्या शनिवारच्या सुटीमुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. प्रदर्शन सकाळ दहा ते सायंकाळी दहापर्यंत सर्वांसाठी खुले असून, रविवारी (ता. 27) प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी आज शेतकरी, वितरक, विक्रेते, पशुपालक यांची मोठी गर्दी होती.

Web Title: NADA and Agri department to introduce new system for fertilizers