अण्णांच्या समर्थनार्थ भर उन्हात आत्मक्लेश सत्याग्रह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

नगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील सत्याग्रहाच्या समर्थनार्थ आज भर उन्हात कार्यकत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून आत्मक्लेश सत्याग्रह केला. 

अण्णांच्या उपोषणाचा आज ६ वा दिवस आहे. केंद्र सरकार सत्याग्रहाची पूर्वकल्पना असून देखील मागण्यांबाबत जाणीवपूर्वक चालढकल करत आहे, असा आरोप सहभागी आंदोलकांनी केला. त्याच्या निषेधार्थ अण्णा समर्थक देशभर मागील ५ दिवसांपासून विविध प्रकारे सत्याग्रह करत आहेत. आज नगरमध्ये भर उन्हात लाक्षणिक उपोषण करत केलेला सत्याग्रह नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. 

कुठलीही घोषणा नाही, निवेदन नाही हे या सत्याग्रहाचे वैशिष्ट्य होते. अण्णांच्या उपोषणाचा ६ वा दिवस असल्याने त्यांची तब्बेत खालावली आहे. वजन ६ किलोपेक्षा अधिक कमी झाले असून, त्यांच्या शरीरातील किटोन या घातक अंशाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या जिवीतालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. सरकारने अजून विलंब केल्यास आज रात्री पासून सत्याग्रह तीव्र करण्यात येऊन भाजप खासदारांच्या घरासमोर झोपमोड आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

आंदोलनास पाठिंबा म्हणून नगर शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी कुटुंबियांसह आज एक वेळचे अन्न सोडले.

Web Title: nagar anna hazare hunger strike