एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणाला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

भुसावळ - मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, नगराध्यक्ष तसेच 17 वॉर्डांतील नगरसेवकांसाठी रविवारी (ता. 15) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्यात बहुतांशी वॉर्डांत चुरशीच्या लढती होत आहेत. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची झालेली युती प्रासंगिक असल्याने त्याचा अनिष्ट परिणाम होऊन खडसेंच्या बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरात मुसंडी मारणे विरोधकांना शक्‍य होऊ नये, यासाठी खडसे स्वत: मुक्‍ताईनगरात तळ ठोकून आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ही नैसर्गिक मैत्री नाही. खडसे यांनी भाजपतर्फे तरुण आणि नवीन उमेदवारांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, असे भाजप समर्थकांचे म्हणणे आहे.

प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावल्याने सोशल मीडिया आणि घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांनी भर दिला. मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 20 जुलैला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: nagarpanchyat election eknath khadse politics