कोतापल्लेंना ‘साहित्यरत्न’, सासणेंना ‘साहित्यभूषण’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

जळगाव - शहरातील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे सूर्योदय वाङ्‌मय पुरस्कार जाहीर झाले आहेत. दलूभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री डॉ. भवरलाल जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांना जाहीर करण्यात आला आहे; तर आठव्या वर्षाचा अखिल भारतीय दलूभाऊ जैन मराठी साहित्यभूषण पुरस्कार प्रसिद्ध लेखक भारत सासणे यांना जाहीर करण्यात आला आहे. 

दलूभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित स्व. कांताबाई भवरलाल जैन यांच्या स्मरणार्थ सूर्योदय सेवा पुरस्कार पुण्यातील लेखिका विनिता ऐनापुरे, सूर्योदय साहित्यभूषण पुरस्कार मुंबईच्या नामवंत लेखिका डॉ. विजया वाड, साहित्यगौरव पुरस्कार मुंबईचे नामवंत लेखक सुबोध जावडेकर, सूर्योदय अक्षररत्न पुरस्कार गझलकार प्रदीप निफाडकर, सूर्योदय बालवाङ्‌मय पुरस्कार जयसिंगपूर येथील लेखिका नीलम माणगावे, तर सूर्योदय सेवाव्रती पुरस्कार युवा लेखक ऐश्वर्य पाटेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान सोहळा ऑगस्ट महिन्यात शहरात होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी कळविले आहे.

Web Title: nagnath kotapalle sahityaratna and bharat sasane sahityabhushan award