'समृद्धी'चे भूसंपादन धिम्या गतीने

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

नाशिक - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन भूसंपादनासाठी पूर्णवेळ अधिकारीच नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्‍यातील नागरिकांनी पूर्णवेळ भूसंपादन अधिकारी नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.

मुंबई-नागपूरदरम्यान समृद्धी महामार्ग उभारला जात असून, नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, सिन्नर तालुक्‍यांतून हा मार्ग जाणार आहे. साधारण 97 किलोमीटरच्या या मार्गात सिन्नर तालुक्‍यातील 24 गावे, तर इगतपुरी तालुक्‍यातील 20 गावांचा समावेश आहे. तेथे सध्या भूसंपादन सुरू आहे. सरकारने नोव्हेंबरमध्ये विठ्ठल सोनवणे यांना भूसंपादन अधिकारीपदी नेमले आहेत;

मात्र सध्या या भूसंपादन अधिकाऱ्यांकडे नाशिक महापालिकेतील भूसंपादन, औद्योगिक विकास महामंडळातील भूसंपादन आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणूनही अतिरिक्त पदभार असल्याने समृद्धीच्या भूसंपादनावर परिणाम झाला आहे.

Web Title: nagpur-mumbai samruddhi highway land aquisition slow