विद्यार्थ्यांना दिली परीक्षेच्या भीतीतून मुक्ती 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

नाशिक - "सकाळ एनआयई' आणि डॉ. जगदीश कुलकर्णी मेमोरिअल जगदिशा फाउंडेशन या संस्थेतर्फे विविध शाळांमध्ये आयोजित परीक्षेची भीती कशी घालवावी, या विषयावरील चर्चासत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. डॉ. श्‍यामा जगदीश कुलकर्णी व डॉ. केयूर कुलकर्णी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या भीतीवर मात करण्यासाठी मोलाचे ठरत आहे. 

नाशिक - "सकाळ एनआयई' आणि डॉ. जगदीश कुलकर्णी मेमोरिअल जगदिशा फाउंडेशन या संस्थेतर्फे विविध शाळांमध्ये आयोजित परीक्षेची भीती कशी घालवावी, या विषयावरील चर्चासत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. डॉ. श्‍यामा जगदीश कुलकर्णी व डॉ. केयूर कुलकर्णी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या भीतीवर मात करण्यासाठी मोलाचे ठरत आहे. 

परीक्षा ही निकालाची धास्ती कशी मिटवावी, परीक्षेच्या काळात टीव्ही व मोबाईलच्या वापराने होणारे दुष्परिणाम कशा प्रकारे टाळता येतात, मनाची एकाग्रता विचलित करणाऱ्या बाबीपासून कशा प्रकारे दूर राहावे, परीक्षेच्या दिवसात अर्ध्या तासापेक्षा जास्त टीव्ही पाहू नये. झोपताना मोबाईल गेम्स, टी.व्ही. यामुळे लवकर झोप लागत नाही. परीक्षेत झोप येते. त्यामुळे नियंत्रित मोबाईल व टीव्हीचा वापर, परीक्षेला जाताना आत्मविश्‍वास कशा प्रकारे वाढवावा, कॉपीमुक्त परीक्षेची आवश्‍यकता, अभ्यासाच्या विविध पद्धती, पालकांनी व विद्यार्थ्यांनी घ्यावयाची आहाराची काळजी, आरोग्याच्या चांगल्या सवयी, मित्रांनाही मानसिक आधार देणे, त्याचबरोबर अपयशाने खचून आलेल्या नैराश्‍यावर मात कशी करावी, आत्महत्येच्या विचारापासून कशा प्रकारे प्रवृत्त व्हावे अशा अनेक बारकाव्यांवर या कार्यशाळेत डॉ. श्‍यामा व केयूर कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. 

नाशिक शहरातील मराठा हायस्कूल, गंगापूर रोड, सारडा कन्या विद्यालय, शालिमार, जनता हायस्कूल, पवननगर, न्यू मराठा हायस्कूल, गंगापूर रोड व शासकीय कन्या विद्यालय, सीबीएस या पाच शाळांमध्ये कार्यशाळा झाली. या सर्व शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी कार्यशाळेसाठी सहकार्य केले. 

या कार्यशाळेने विद्यार्थ्यांना काय दिले? 
1) परीक्षा ही फक्त मूल्यमापनासाठी आहे. त्यामुळे निकालाची बरोबरी आयुष्याशी करू नका. 
2) स्पर्धा स्वत-शी करा. 
3) अभ्यासाच्या, रिव्हिजनच्या सोप्या पद्धती वापरा. 
4) परीक्षेच्या काळात टी.व्ही. कमी पाहा. 
5) मोबाईल गेम्स एकाग्रतेला, स्मरणशक्तीला घातक असतात. 
6) परीक्षेच्या काळात सात तास झोप घ्या. जागरणाने पेपर लिहिताना विचारांची गती मंदावते. 
7) परीक्षेच्या काळात घरचा चौरस आहार घ्या. 
8) आपल्या मित्र-मैत्रिणींत कोणी खूपच डिस्टर्ब, टेन्शनमध्ये असेल तर त्याला मानसिक आधार द्या. तुम्हीच आत्महत्या थांबवू शकता. 

Web Title: nahik news student sakal NIE