‘ती’ कारवाई एसपी, ॲडिशनल एसपींच्याच आदेशाने! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

जळगाव - चोपडा शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशन नजन-पाटील यांच्यावर एसपींनी कंट्रोल जमा केल्याची कारवाई केली. वास्तविक पोलिस कर्मचारी निकम आणि निरीक्षक नजन-पाटील हे अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि लोहीत मतानी यांच्या आदेशानेच सहा डिसेंबरच्या बंदोबस्तादरम्यान बेशिस्त वाहतुकीवर कारवाई करतानाच नरेंद्र पाटील याचे वाहन थांबले होते. असे असताना भाजप पदाधिकाऱ्यावर कारवाई केल्याचे रान माजवत जिल्हाध्यक्ष आणि मंत्रिमहोदयांच्या दबावातून तडकाफडकी नजन- पाटलांना रात्रीतून ‘कंट्रोल जमा’ करण्यात आले.

जळगाव - चोपडा शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशन नजन-पाटील यांच्यावर एसपींनी कंट्रोल जमा केल्याची कारवाई केली. वास्तविक पोलिस कर्मचारी निकम आणि निरीक्षक नजन-पाटील हे अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि लोहीत मतानी यांच्या आदेशानेच सहा डिसेंबरच्या बंदोबस्तादरम्यान बेशिस्त वाहतुकीवर कारवाई करतानाच नरेंद्र पाटील याचे वाहन थांबले होते. असे असताना भाजप पदाधिकाऱ्यावर कारवाई केल्याचे रान माजवत जिल्हाध्यक्ष आणि मंत्रिमहोदयांच्या दबावातून तडकाफडकी नजन- पाटलांना रात्रीतून ‘कंट्रोल जमा’ करण्यात आले. आदेशाचे पालन करा, गुंड मारतील..नाही करा साहेब मारेल, अशा अवस्थेतही कारवाई करून शिक्षा भोगण्याची वेळ चोपडा प्रभारींवर आली आहे. 

पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंदे आणि वाहतुकीच्या कारवाईचे स्पेशल ‘टास्क’ (निर्धारित लक्ष) जिल्ह्यातील प्रभारींना देण्यात आले आहेत. चोपडा शहरात त्या दिवशी (सहा डिसेंबर) रोजी याच आदेशाचे पालन करीत पोलिस कर्मचारी निकम बेशिस्त वाहतूक धारकांवर कारवाई करत असताना भाजप शहराध्यक्ष नीलेश साहेबराव पाटील याचे वाहन थांबविले आणि नंतर राडा झाला होता. कोणाचे? वाहन थांबतो, या अविर्भावातून वाद होऊन थेट पोलिस निरीक्षकांच्या कॉलर पकडेपर्यंत नीलेश व त्याच्या मित्रांनी मजल गाठली. या दोघांवर नंतर कायदेशीर कारवाई केल्याचा ‘इगो’ हर्ट होऊन सूत्रे फिरली..भाजपच्या मोठ्या पदाधिकाऱ्याने थेट फोन करून...थांब तुझ्या बापालाच फोन करून सांगतो, तुझ्या अंगावर वर्दी कशी राहते, असा दम दिला. नंतर चोवीस तासांच्या आत नजन पाटील यांच्यावर अवैध धंद्याचे उच्चाटन करण्यास असमर्थ असल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांना तडकाफडकी ‘कंट्रोल-जमा’ केले    

नरेंद्रचे प्रोफाइल स्ट्राँग..!
भाजप पदाधिकारी नरेंद्र साहेबराव पाटील याच्यावर चोपडा शहरात विविध सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ग्रामीण रुग्णालयात महिलेवर हात उगारून झोंबाझोंबी केली होती, नंतर वर्ष-२०१३ आणि नंतर दोन वर्षांनी २०१५ असे दोन वेळेस अमळनेर प्रांताधिकारी कार्यालयाने राजकीय दबावातून तो, पारित केला नसल्याने पडून राहिला.

Web Title: Najan Patil transfer case in jalgaon