राजमानेत 'सकाळ'तर्फे नाला खोलिकरणाला प्रारंभ 

दीपक कच्छवा
शुक्रवार, 18 मे 2018

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) - येथे 'सकाळ' रिलीफ फंडाच्या माध्यमातुन नाला खोलिकरणाचा प्रारंभ आज सकाळी झाला. तनिष्का गटाने गावातील पाणी टंचाई दुर होण्यासाठी नाला खोलिकरणाची मागणी केली होती. त्यानुसार हे काम झाले. 

कळमडु (ता.चाळीसगाव) ग्रामपंचायतीच्या अख्यत्यारित येणाऱ्या राजमाने गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना भटकंती करून पाणी आणावे लागत आहे. येथील पाणीप्रश्न सोडविण्यासंदर्भात 'सकाळ' माध्यम समूहाच्या तनिष्का गटातील महिलांनी निर्धार केला होता. त्यानुसार गावात नालाखोलीकरणाच्या कामाचा प्रस्ताव तनिष्कांनी 'सकाळ'कडे सादर केला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, आज (18 मे) राजमाने येथे संगणक अभियंता गुणवंत सोनवणे, 'सकाळ'च्या खान्देश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा, तनिष्का व्यवस्थापक अमोल भट, सरपंच कविता पाटील, उपसरपंच अरूणा केदार यांच्यासह तनिष्कांच्या उपस्थितीत नाला खोलिकरणाच्या कामाचा प्रारंभ झाला.

Web Title: nala kholikaran by sakal relief fund