PHOTO : आठवली का ती ऍना? 'ही' मराठी अभिनेत्री होणार नामपूरची सून 

प्रशांत बैरागी : सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 18 December 2019

साधारण नऊ वर्षांपूर्वी ललित कला केंद्रात अभिनेत्री पूजा आणी कुणालची पहिली भेट झाली. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाल्याने दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. नामपूर ( ता. बागलाण ) येथील अभिनयाचे शिक्षण घेतलेल्या कुणाल अहिरराव व पूजा ठोंबरे यांचा नामपूर येथील कृष्णाई मंगल कार्यालयात साखरपुडा झाला आहे. त्यामुळे एक मराठी तारका नामपूरची सुनबाई होणार असल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. 

नाशिक :  चित्रपटसृष्टी, मालिका किंवा रंगभूमी असो, त्यात अभिनय करणाऱ्या कलाकारांच्या विवाहाबद्दल साऱ्यांनाच उत्सुकता असते. झी मराठी वाहिनी वरील 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील ऍना हे विनोदी पात्र साकारणारी  निरागस स्वभावाची अभिनेत्री पूजा ठोंबरेला तिच्या आयुष्याचा राजकुमार गवसला असून लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नामपूर ( ता. बागलाण ) येथील अभिनयाचे शिक्षण घेतलेल्या कुणाल अहिरराव व पूजा ठोंबरे यांचा नामपूर येथील कृष्णाई मंगल कार्यालयात साखरपुडा झाला आहे. त्यामुळे एक मराठी तारका नामपूरची सुनबाई होणार असल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. 
 

नऊ वर्षांपूर्वी पूजा आणी कुणालची पहिली भेट             

कुणालचे प्राथमिक शिक्षण नामपूर येथील अभिनव बालविकास मंदिर येथे झाले. त्याला लहानपणापासून नाटिका, सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड होती. बारावीनंतर पारंपरिक अभ्यासक्रमाऐवजी कुणालने अभिनयाची वाट निवडली. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात प्रवेश घेतला. तेथे तीन वर्षांच्या काळात विविध कलांचा अभ्यास करून नाट्यशास्त्रची पदवी घेतली. त्यानंतर चार वर्षे कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले. साधारण नऊ वर्षांपूर्वी ललित कला केंद्रात अभिनेत्री पूजा आणी कुणालची पहिली भेट झाली. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाल्याने दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing

पूजा व कुणालचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर

पूजा सध्या सोनी मराठी वाहिनी वरील 'नवरी मिळे नवऱ्याला' या मालिकेत कावेरी नावाचे पात्र साकारताना दिसत आहे. तर कुणाल कलर्स मराठी वाहिनीवरील 'सूर नवा ध्यास नवा' या शोच्या क्रिएटिव्ह टीममधील महत्वाचा सदस्य आहे. पूजा व कुणालने आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. पूजाने फेसबुकवर  तिच्या एका खास मैत्रिणीचे आभारदेखील मानले आहे. अभिनेत्री आरती वबडगावर ही पूजाची जवळची मैत्रीण असून तिनेच पूजा आणि कुणालचे साखरपुड्याचे कपडे डिझाइन केले आहे. खास दिवसासाठी सूंदर कपडे डिझाइन केल्याबद्दल पूजाने आरतीचे आभार मानले आहेत.
   

मैत्रीत दगा...मित्राचाच मृतदेह टाकला शौचालयाच्या टाकीत...पण का?          

शुभेच्छांचा वर्षाव

साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यानंतर मराठी सिनेसृष्टीतून आणि चाहत्यांकडून पूजा कुणालवर  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनंत कान्हो, अश्विनी गिरी, सायली संजीव, ऋजुता बागवे, उर्मिला निंबाळकर, इशा केसकर, मंजिरी ओक, वैभव चिंचाळकर, अश्विनी केसकर यांच्यासह अनेकांनी पूजाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. साखरपुड्याच्या फोटोत पूजा आणि कुणाल दोघेही अतिशय सुंदर दिसत आहे. साखरपुड्याला पूजाने पारंपरिक साडी परिधान केली तर कुणालने  पुणेरी पगडीत परिधान केली आहे. कुणालच्या फेसबुक पेजवर त्याचे आणि पूजाचे जुने फोटो बघायला मिळतात.  हे दोघे गेल्या नऊ  वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत.
 

PHOTOS : माणुसकी निभावून दाखवूयाच!..'या' तरुणांचं ठरलं तर...             

अल्पावधीतच पुजाचा मोठा चाहतावर्ग 

पूजा मुळची बीड जिल्ह्यातील आहे. येथील केएसके महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाची माजी विद्यार्थिनी पूजा ठोंबरे हिने आपल्या अभिनयाने अल्पावधीतच आपली मोठी चाहतावर्ग निर्माण केला आहे. तिने शालेय जीवनापासून ते आतापर्यंत अगणित पुरस्कार पटकावले आहेत. ई टीव्ही, झी मराठी तसेच विविध दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून अभिनय व नृत्याचे कसब पणाला लावत मराठी रंगभूमीवर अभिनयाची छाप पाडत मायानगरीत आपले स्थान निर्माण केले आहे. 

PHOTO : चोंढी घाटात बस-कारचा भीषण अपघात.. दोन ठार, चार जखमी           

बालनाट्यातून तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला गती

बीड नाट्य परिषद आणि केएसके महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने उन्हाळी बालनाट्य प्रशिक्षण घेतले जाते. याच शिबिरातून अभिनयाची बाराखडी गिरवत पूजाने नाट्यशास्त्राचा अभ्यास केवळ पूर्ण केलाच असे नाही, तर नैपुण्यदेखील मिळवले. बीड येथे ‘राजा राणीला घाम हवा’ या बालनाट्यातून तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला गती मिळत गेली. द डम डान्सर, बियाँड द डिझायर, शिल्पकोष्टक यासारख्या नाटकांतून भूमिका करत पूजाने नाट्यशास्त्रातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. ललित कला केंद्रात शिक्षण घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nampur's daughter-in-law will become actress pooja thombre nashik marathi news