येवल्यात पंचायत समितीच्या सभापती शिवसेनेच्या नम्रता जगताप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

येवला - येथील पंचायत समितीच्या सभापती शिवसेनेच्या नम्रता जगताप यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीनुसार आशा साळवे यांनी
 सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने या निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती.

येवला - येथील पंचायत समितीच्या सभापती शिवसेनेच्या नम्रता जगताप यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीनुसार आशा साळवे यांनी
 सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने या निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती.

पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता असून, प्रथम अडीच वर्षांसाठी ओबीसी महिलेचे आरक्षण आहे. पहिल्या टप्प्यात साळवे यांना संधी देण्यात आली होती. आता जगताप यांना उर्वरीत कालावधीसाठी संधी मिळाली आहे. आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत भीमराज दराडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत सकाळी ११ वाजता शिवसेनेच्या वतीने अंदरसुल पंचायत समिती गणातील सदस्य नम्रता जगताप यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावर सूचक म्हणून सदस्य प्रवीण गायकवाड तर दुसऱ्या अर्जावर सूचक म्हणून सदस्य लक्ष्मीबाई गरुड यांच्या सह्या होत्या.

विहित मुदतीत एकमेव अर्ज आल्याने दराडे यांनी जगताप यांची बिनविरोध निवड घोषित केली. यानंतर नवनिर्वाचित सभापती जगताप यांचा सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी दराडे, सहाययक निवड निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी सुनील आहिरे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, माजी आमदार मारोतीराव पवार, ऍड .माणिकराव शिंदे, पणन महामंडळाच्या अध्यक्षा उषाताई शिंदे, भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार यांनी स्मानतेवर शिवसेनेचा विश्वास असल्यानेच आज जगताप यांनी निवड सभापती पदावर केली आहे. सभापतीपदाच्या संधीचा फायदा जगताप यांनी तालुक्याच्या विकास कामांसाठी करावा असे आवाहन पवार यांनी यावेळी केले. जिल्ह्यात शिवसेनेची घौडदौड सुरू असून, नाशिक विधान परिषदेवर नरेंद्र दराडेंचा विजय झाला. चांगले काम केले तर सर्वच जण पाठिंबा देतात. आताही सभापती जगताप यांनाही तसा पाठिंबा सर्वपक्षीयांकडून मिळेल असा आशावाद यावेळी भाऊ चौधरी यांनी व्यक्त केला. 

शिवसेनेचा सभापती सलगपणे दुसऱ्यांदा संभाजी पवारांमुळे झाला याचे श्रेय देताना ऍड.माणिकराव शिंदे यांनी पवारांनी तालुक्यात चांगले काम उभे केले असल्याची ग्वाही दिली. यावेळी श्री. तांबडे, सन्तु पाटील झांबरे, भास्कर कोंढरे, मकरंद सोनवणे, झुंझार देशमुख, उषाताई शिंदे, चंद्रकांत शिंदे, माजी सभापती आशा साळवे, संजय बनकर, राजू परदेशी, आदींचे शुभेच्छापर भाषणे झाली. याप्रसंगी संभाजीराजे पवार, जेष्ठ नेते साखरचंद साळवे, उपसभापती रुपचंद भागवत, सदस्य मंगेश भगत, प्रवीण गायकवाड, मोहन शेलार, लक्ष्मीबाई गरुड ,कविता आठशेरे, अनिता काळे, सुनीता मेंगाने, वाल्मिक गोरे, शरद लहरे, अरुण काळे, कांतीलाल साळवे, अमित पाटील, संध्या पगारे, पुंडलिक पाचपुते, विठ्ठलराव आठशेरे, केसरीनाथ पाटील, प्रज्वल पटेल, दिलीप मेंगळ, नवनाथ काळे, बाळासाहेब पिंपरकर, कुणाल धुमाळ, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, भागीनाथ थोरात, विठ्ठल पिंपळे, राहुल लोणारी, शिवाजी वडाळकर, रवी काळे, मनोज रंधे, अमोल सोनवणे, बी.आर.लोंढे आदी उपस्थित होते.

Web Title: Namrata Jagtap of Shiv Sena, Chairman of Panchayat Samiti in Yeola