नांदेडात नोकर भरतीचा पुन्हा मोठा घोटाळा

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 2 मे 2018

सरकारी नोकरी लावण्याचे आमीष दाखविणाऱ्या एका टोळीविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड - सबंध राज्यभर गाजत असलेले डीम परिक्षार्थी व जिल्हा पोलिस भरती प्रकरणाचा तपास सुरू असतांनाच पुन्हा एकदा नांदेड नोकर भरती संदर्भाने अनेक बेरोजगारांना लाखोंचा गंडा घातला. सरकारी नोकरी लावण्याचे आमीष दाखविणाऱ्या एका टोळीविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सुधाकर किशन पवार याला अटक करण्यात आली आहे. तो पोलिस कोठडीत आहे. या रॅकेटने अनेक बेरोजगारांची फसवणूक केली असून बोगस अध्यादेश (जीआर) च्या माध्यमातून काहीना नोकऱ्याही लावल्या आहेत. या सर्वांचे देखील पितळ लवकरच उघडकीस पडणार आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Nanded job recruitment scandal