नांदगाव : उन्हात दोन तासांच्या प्रतिक्षेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारले जेष्ठांचे निवेदन

Nandgaon District Collector accepted the request of senior citizen after two hours
Nandgaon District Collector accepted the request of senior citizen after two hours

नांदगाव : सगळीकडे जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नांदगावमधील मोर्चा काढणाऱ्या जेष्ठ नागरिकांना तहसीलदारांच्या कडून मिळालेल्या वागणुकीमुळे हा दिवस साजरा करू पाहणारे जेष्ठ नागरिक सनदी अधिकाऱ्यांच्या वर्तनाने हवालदिल झाले आहेत. जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा करतांना विविध मागण्याचे निवेदन घेऊन गेलेल्या जेष्ठांना संवेदनाहीन वागणूक मिळाल्याचे पडसाद आज उमटले.

संतापलेल्या जेष्ठांनी घटनेचा निषेध उद्या मंगळवारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीदिनी सत्याग्रह करण्याचा मनोदय व्यक्त करताच पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर प्रकरणाचे लक्षात येताच तहसीलदारांनी दोन तासाहून अधिक काळासाठी उन्हात तिष्ठत बसलेल्या जेष्ठ नागरिकांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले. मात्र निवेदन स्वीकरतानाही जेष्ठांना खडे बोल सुनावले एकूणच मोर्चा काढल्यावर कटू अनुभव पदरी आलेल्या व भांबावून गेलेल्या जेष्ठांनी तहसीलदारांच्या वर्तनाचा निषेध करणारी निवेदने महसूल आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना पाठविली आहेत.

याबाबत माहिती अशी येथील जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने आजच्या जागतिक जेष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी शहरातील विविध राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला वंदन करून मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सांगता जुन्या तहसीलला झाली. हा मोर्चा काढणार असल्याची पूर्वकल्पना पोलिस व तहसील यंत्रणेला 25 सप्टेंबरलाच देण्यात आली होती. हे विशेष मोर्चेकरी जेष्टांचे निवेदन स्वीकारण्यासाठी महसुलाची यंत्रणा येत असते हा पूर्वानुभव व शिरस्ता लक्षात घेत तहसीलदार भारती सागरे येतील. अशा भाबड्या समजुतीत असणाऱ्या जेष्ठांनाच त्याच्या आगमनासाठी तिष्ठत बसावे लागू नये, म्हणून संघाचे अध्यक्ष रंगनाथ चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते संजय मोकळ यांनी श्रीमती सागरे यांची भेट घेत त्यांना निवेदन स्वीकरण्यासाठी विनंती केली. मात्र चार पाच जणांचे शिष्टमंडळ घेऊन माझ्या दालनात या अशी भूमिका घेत त्यांना माघारी पाठविले जुने तहसील ते नवे तहसील यातील अंतर रेल्वे फाटकाची अडचण व वाहतुकीची कोंडी यामुळे जुन्या तहसीलवर मोर्चा काढणाऱ्यांनी आपल्या दालनात शिष्टमंडळ घेऊन यावे, असे सांगत नकार देण्यात आलेल्या जेष्ठांनी मग येवल्याच्या प्रांताधिकारी भीमराज दरगुडे यांचे फोनवरून लक्ष वेधले व उद्याच तहसीलदार सागरे यांच्या वर्तनाचा निषेध म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधित सत्याग्रह करू असा इशारा दराडे यांना दिला.

दरम्यान परिस्थिती चिघळत असल्याचे बघून पोलिस निरीक्षक अनिल भाकरी यांनी हस्तक्षेप करीत मार्ग काढण्याच प्रयत्न केला सुरवातीला निवेदन स्वीकरण्यासाठी आढेवेढे घेणाऱ्या तहसीलदार सागरे आल्यात जेष्टाना बघतच त्यांनी पोलिस स्थानकात जाणे पसंत केले त्यांनतर जेष्टाना खडे बोल स्वीकारत अखेरीस पोलिस निरीक्षक भाकरी यांच्या उपस्थितीतच निवेदन स्वीकारले. ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रंगनाथ चव्हाण, जयंत साळवे कुसुम सावंत, वामन पोतदार, सुरेश दंडगव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते संजय मोकळ, सुरजमल संत, अंबादास पैठणकर व इतर जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य या मोर्चात सहभागी झाले 

मी वयाने जेष्ठ असलेली महिला असूनही तहसीलदार असलेली महिला माझ्याशी देखील उद्धट वागल्याचे दुःख कायम लक्षात राहील. : कुसुमताई सावंत 

अवमान प्रकरण खेदजनक असून तहसीलदाराकडून यांच्याकडून माहिती करून घेणार आहे. सौजन्यपूर्ण वागणे ही सर्वांची जबाबदारी आहे. : भीमराज दराडे प्रांताधिकारी येवला  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com