नांदगाव उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

नांदगाव : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेसाठी जाहीर करण्यात आलेल्या नाशिक विभागात नांदगाव तालुक्याच्या निकालाची सरासरी ८५. १९ % एवढी राहिली. तालुक्याच्या एकूण विविध अठरा केंद्रातून दोन हजार ६२७ विद्यार्थ्यांपैकी दोन हजार २३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात वेहेळगाव व मनमाड येथील माध्यमिक रेल्वे विद्यालयाच्या विज्ञान शाखेने शंभर टक्के यश मिळविले हा अपवाद वगळला तर साधारणतः बारावीच्या निकालाचा टक्केवारीत विज्ञान शाखेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची यंदाची टक्केवारी समाधानकारक लागली आहे.

नांदगाव : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेसाठी जाहीर करण्यात आलेल्या नाशिक विभागात नांदगाव तालुक्याच्या निकालाची सरासरी ८५. १९ % एवढी राहिली. तालुक्याच्या एकूण विविध अठरा केंद्रातून दोन हजार ६२७ विद्यार्थ्यांपैकी दोन हजार २३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात वेहेळगाव व मनमाड येथील माध्यमिक रेल्वे विद्यालयाच्या विज्ञान शाखेने शंभर टक्के यश मिळविले हा अपवाद वगळला तर साधारणतः बारावीच्या निकालाचा टक्केवारीत विज्ञान शाखेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची यंदाची टक्केवारी समाधानकारक लागली आहे. कला वाणिज्य व विज्ञान अशा विविध शाखेत बोर्डाने ठरवून दिलेल्या यशाच्या वर्गवारीत यंदा नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी यश मिळविले 

निकाल पुढील प्रमाणे
नांदगाव मप्रवि महाविद्यालयाचा एकूण निकाल ८५.२०% त्यात शाखा निहाय निकाल सायन्स ९७.८२% कॉमर्स ९७.७९ % कला ६७.०५ %
न्यायडोंगरी येथील लोकनेते कै अँड विजय शिवराम आहेर हायस्कूल व ज्युनियर काँलेजचा निकाल ८८.५५ % लागला
वडाळी येथील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय ८८.५२ %
अनकवाडे येथील त्र्यम्बक शेजवळ उच्च माध्यमिक विद्यालय ८३. ३३%
वसंतनगर येथील व्ही एन नाईक उच्च माध्यमिक ७२.५९ %
पानेवाडी येथील एल पी मंडळ उच्च माध्यमिक विद्यालय ७२.७२%
वेहेळगाव येथील व्ही एन नाईक विद्यालयाचा कला शाखेचा ९०.५४ तर विज्ञान शाखेचा शंभर टक्के असा एकूण निकाल ९५.% लागला
जनता विद्यालयाचा ८६. ६६ %
साकोरा येथील कर्मवीर भाऊराव विद्यालयाचा विज्ञान शाखेचा ९७ . २२ % तर कला शाखेचा ७३.४६ % असा एकूण ८३,५२ % निकाल लागला
भालुर येथील जनता विद्यालयाचा ८९.३३ %
बोलठाण येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ७५.३८ % निकाल लागला
मनमाड शहरातील आर्ट कामर्स व सायन्स कॉलेज मधील विज्ञान शाखेचा ९१.०५ % वाणिज्य शाखेचा ८४.०७%  तर कला शाखेचा ६५.८८ % असा एकूण ७९. ११ % निकाल लागला
छत्रे न्यू इंग्लिश स्कुल च्या एकमेव असलेल्या विज्ञान शाखेचा ९५.८७ % असा निकाल लागला
एच ए के उर्दू उच्च माध्यमिक च्या एकमेव कला शाखेचा ६२.५० % निकाल लागला
मनमाडच्या मप्रविच्या आर्ट्स सायन्स कामर्स चा ६३.७९ % असा निकाल लागला 

बारावीसाठी तालुक्यातून एकूण अठरा केंद्र होती त्यात ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या सारताळे  येथील कै बाबुलाल देवचंद पगार पोस्ट बेसिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेतील विज्ञान शाखेचा ९८.९३ % तर कला शाखेचा ८५ % असा एकूण ९३.५४ % निकाल लागला. संस्थेचे सरचिटणीस रमेश पगार प्राचार्य रवींद्र पगार मुख्याध्यापिका नम्रता पगार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले याच ग्रामीण विकास संस्थेच्या तालुक्यातील पळाशी येथील न्यू इंग्लिश स्कुल येथील बारावीचा ९३.४७ % असा निकाल लागला आमोदे येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या  कै वामनराव सोनुजी पगार पोस्ट बेसिक व उच्च माध्यमिक आदिवसी आश्रमशाळेतील विज्ञान शाखेचा ९८. १८ % तर कला शाखेचा ९४.४४ % असा एकूण ९६.३३ % असा निकाल लागला संस्थेचे सरचिटणीस आण्णासाहेब पगार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले 

बारावी परीक्षा दृष्टीक्षेपात नांदगाव तालुका
एकूण केंद्रे संख्या अठरा ,दोन आदिवासी आश्रमशाळा 
एकूण परीक्षेला  बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : २६२७ 
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या :- २२३८ 
७५ % च्या वर गुणप्राप्त विद्यार्थी संख्या :- ६६ 
प्रथम श्रेणी त उत्तीर्ण विद्यार्थी संख्या :- ९९८ 
द्वितीय श्रेणी उत्तीर्ण विद्यार्थी संख्या :- ११११ 
इतर गुण देऊन उत्तीर्ण विद्यार्थी संख्या :- ६३ 
एकूण तालुक्याचा निकाल :- ८५.१९ % 

Web Title: nandgaon higher secondary School test results declared