बहिणीपाठोपाठ भावाचीही आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

नांदगाव - सावरगाव (ता. नांदगाव) येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येनंतर तिच्या भावानेही काल (ता. 26) विषप्राशन करत आत्महत्या केली. येथील स्मशानभूमीलगत कडूलिंबाच्या झाडाखाली तिच्या 23 वर्षीय भावाचा मृतदेह आढळला. पोलिसपाटील सोमनाथ देवराम निकम यांनी याबाबत पोलिसांत माहिती दिली. चौदावर्षीय अल्पवयीन मुलीने 13 डिसेंबरला राहत्या घरी शेतातील फवारणीसाठी आणलेले विषारी औषध प्राशन केले होते. मुलीच्या कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी तिला चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारांदरम्यान 16 डिसेंबरला या मुलीने मुलाला जन्मही दिला होता. मात्र, जन्मलेले अर्भक मृत झाले. ही घटना होऊन दोन दिवस उलटत नाही तोपर्यंत अल्पवयीन मुलीच्या भावाने आत्महत्या केली. मृत मुलीचा तो सावत्रभाऊ होता.
Web Title: nandgaon news suicide