
Nandurbar Agriculture: कापूस घरात अन् नवे वाण आले बाजारात..! खरिपाच्या तयारीत शेतकरी व्यस्त
Nandurbar Agriculture : खरीप हंगामात सर्वाधिक लागवड केल्या जाणाऱ्या कपाशीच्या नवनवीन वाणाची सध्या गावोगावी विविध कंपन्यांकडून जाहिरात सुरू आहे, तर दुसरीकडे कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शहादा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस अजून घरातच पडून आहे. (Nandurbar Agriculture cotton new varieties in market Farmers busy preparing for Kharif season)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कापसाचे भाव वाढण्याची कुठेही चिन्हे दिसत नाहीत. अशा वेळी खरीप हंगामाची मशागत, खते, बियाण्यासाठी पैशांची तजवीज कशी करावी, या चिंतेने शेतकऱ्यांची कोंडी झाल्याचे दिसत आहे. शहादा तालुक्यात मागच्या खरीप हंगामात सर्वांत जास्त कपाशी पिकाची ४९ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात होती.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी बियाणे, खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली. दुसरीकडे मशागत आणि फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांच्या किमतीत ही वाढ झाली. प्रारंभी कापसाला ११ हजार रुपयांचा भाव मिळाला.
मात्र ११ हजारांवरून हे दर आठ हजार रुपयांपर्यंत आले. सध्या बाजारात सात हजार ६०० ते ८०० रुपये भाव मिळत आहे. दिवसेंदिवस कापसाच्या भावात घसरण सुरू आहे. पर्यायी येणाऱ्या खरीप हंगामातील पिकासाठी लागणारी खते, बियाणे व कापूस लागवडीसाठी भांडवल नसल्याने शेतकऱ्यांना कमी भावात कापूस विकावा लागत आहे.