सांगली, कोल्हापूरपाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातही महापूर (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

शहादा शहरात सर्वत्र पाणी साचल्याने शहर जलमय झाले आहे. बसस्थानक परीसरातही पाणी साचले असून सर्वच प्रमुख रस्ते पाण्याखाली असल्याने शहादा आगारातून आज सकाळपासून फक्त शहादा नाशिक व शहादा धुळे या दोनच फेऱ्या झाल्या आहेत.
 

नंदुरबार : कोल्हापूर आणि सांगली शहरात पुराने थैमान घातलेले असताना उत्तर महाराष्ट्रातील शहादा शहरात सर्वत्र पाणी साचल्याने शहर जलमय झाले आहे. बसस्थानक परीसरातही पाणी साचले असून सर्वच प्रमुख रस्ते पाण्याखाली असल्याने शहादा आगारातून आज सकाळपासून फक्त शहादा नाशिक व शहादा धुळे या दोनच फेऱ्या झाल्या आहेत.

उर्वरित सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे शहादा दोंडाईचा रस्त्यावर भेंडवा नाल्याला पूर आल्याने पुराचे पाणी पुलावरून वाहत आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर बससेवा पूर्ववत सुरू करण्यात येतील अशी माहिती आगार प्रमुख योगेश लिंगायत यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nandurbar district in north Maharashtra too witnesses flood situation