Nandurbar News : नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचा गुन्हेगारांवर वचक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

P. R. Patil, District Superintendent of Police, Nandurbar

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचा गुन्हेगारांवर वचक

नंदुरबार : देशाच्या अंतर्गत सुरक्षेत पोलिस दलाचा महत्त्वाचा वाटा आहे. चोरी, खून, दरोडे, खंडणी यांसारख्या पारंपरिक गुन्हे करणाऱ्या आरोपींना त्यांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीवरून पकडणे आव्हानात्मक असते.

नंदुरबार जिल्हा पोलिस दल गुन्हेगारांवर वचक आणि कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. हे नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने २०२२ मध्ये केलेल्या वार्षिक कामगिरीवरून स्पष्ट होते, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली. (Nandurbar District Police Force on criminals strict action nandurbar news)

हेही वाचा: Nashik News : शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एक सीसीटीव्ही’; पोलिस आयुक्तांचे व्यापाऱ्यांना आवाहन

नंदुरबार जिल्ह्यात २०२२ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत सहा हजार ८४ गुन्हे दाखल झाले होते. त्यांपैकी पाच हजार ५७८ गुन्हे उघडकीस आणण्यात नंदुरबार जिल्हा पोलिस दलाला यश आले असून, दाखल गुन्ह्यांपैकी उघडकीस गुन्ह्यांचे प्रमाण ९२ टक्के आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचे गुन्हे शाबितीचे प्रमाणदेखील ३८ टक्के आहे.

नंदुरबार जिल्ह्यात २०२२ मध्ये खुनाचे ३५ गुन्हे दाखल झाले होते. त्यांपैकी ३५ गुन्हे उघडकीस आणण्यात नंदुरबार जिल्हा पोलिस दलाला यश आले असून, खुनाच्या दाखल गुन्ह्यांपैकी उघडकीस गुन्ह्यांचे प्रमाण १०० टक्के आहे.

त्याचप्रमाणे खुनाचा प्रयत्न करण्याचे ३५ गुन्हे घडले असून, सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. मालमत्तेविरुद्धचे, दरोड्याचे नऊ गुन्हे दाखल असून, सर्व गुन्हे उघडकीस आहेत. तसेच एकूण मालमत्तेविरुद्धचे ८७३ गुन्हे दाखल आहेत. २४६ गुन्हे उघडकीस आले असून, ४३ लाख ५४ हजार ५२१ रुपये किमतीची चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Gautam Adani News : आधी वीज, मग गॅस, आता गौतम अदानी पोहोचवणार प्रत्येक घरात...

त्याचप्रमाणे दुखापतीच्या २६८ पैकी २६८ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. २०२२ मध्ये बलात्कार, विनयभंग व इतर महिलांविरुद्धच्या ३३३ दाखल गुन्ह्यांपैकी ३२१ गुन्हे उघडकीस असून, त्यांचे प्रमाण ९७ टक्के आहे. महिलांविषयक दाखल झालेल्या गुन्ह्यांची निर्गती करण्यात आलेली आहे.

फसवणुकीच्या ४० दाखल गुन्ह्यांपैकी ३७ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. अवैध दारू, जुगार, गांजा इत्यादी अवैध धंद्यांविरुद्धदेखील नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने २०२१ च्या तुलनेत भरीव कामगिरी केलेली आहे. २०२१ मध्ये अवैध दारू, जुगार असा अवैध धंद्यांविरुद्ध दोन हजार ३२८ गुन्हे दाखल करून तीन कोटी ९१ लाख ६७ हजार २६३ रुपये किमतीची दारू, जुगार व इतर साधने जप्त करण्यात आलेली आहेत. २०२२ मध्ये दोन हजार ५८४ अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून पाच कोटी ८९ लाख ८१ हजार ३२ रुपये किमतीची दारू, जुगार व इतर साधने जप्त करण्यात आलेली आहेत.

एनडीपीएस कायद्यांतर्गत आठ गुन्हे दाखल करून त्यांच्या ताब्यातून ३८ लाख ३२ हजार २२२ रुपये किमतीचा गांजा, अफूची बोंडे, चुरा इत्यादी जप्त करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणारे, तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या एक गुन्हेगारी टोळीतील सहा व्यक्तींना नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे. तसेच दाखल गुन्ह्यातील अटक करण्यात आलेल्या पाच हजार ७४ आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

हेही वाचा: Jalgaon News : बाजार समितीतर्फे अवैध दुकाने बांधण्यास परवानगी

गुन्हेगारांवर वचकसाठी उपाय

नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दाखल गुन्हे उघड करण्यावर नंदुरबार जिल्हा पोलिस दल भर देत असून, गुन्हेगारीला आळा बसावा याकरिता नंदुरबार जिल्हा पोलिस दल वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे, तसेच नंदुरबार जिल्हा पोलिस दलाकडून गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे, असे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: Jalgaon News : बाजार समितीतर्फे अवैध दुकाने बांधण्यास परवानगी