परभणीच्या अभियंत्यासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

नंदुरबार - येथील रहिवासी व परभणी जिल्हा परिषदेचे उपअभियंता मोहनलाल भोई, त्याची पत्नी चंद्रकला भोई या दोघांविरुद्ध अपसंपदा बाळगल्याचा गुन्हा आज शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.

अपसंपदेबाबतचा जिल्ह्यातील हा पहिला गुन्हा आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे देण्यात आली. भोई दांपत्याकडे साडेदहा लाखांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे.

परभणी जिल्हा परिषदेच्या गंगाखेड (जि. परभणी) उपविभाग वर्ग दोनचे उपअभियंता मोहनलाल बन्सीलाल भोई येथील जयचंदनगरमधील रहिवासी आहेत. त्यांच्याकडील अपसंपदेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी होत्या, त्याअनुषंगाने चौकशी सुरू होती. या चौकशीअंती ज्ञान स्रोतांपेक्षा दहा लाख 26 हजार 590 रुपयांची अधिक मालमत्ता त्यांच्याकडे असल्याचे उघड झाले आहे. त्यात घर, जमीन आणि अन्य मालमत्तेचा समावेश आहे. अपसंपदेसाठी त्यांची पत्नी चंद्रकला भोई यांनी साहाय केले. म्हणून दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे.

Web Title: nandurbar news crime on engineer with wife