नंदुरबार : दोन विभिन्न गटातील वादानंतर संचारबंदी लागू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

पाच जूनला वृध्द व्यावसायिकास पेटविण्याचा प्रयत्न ग्राहकाने केला. त्याचवेळी त्या ग्राहकासदेखील जमावाने मारहाण केली. या घटनेत व्यावसायीक आणि ग्राहक दोघे गंभीर जखमी झाले.

नंदुरबार - शहरात पाच जूनला दोन विभिन्न गटातील दोन व्यक्तींमध्ये टोकाचा वाद झाला. त्यातील एकाचे आज पहाटे मुंबईला उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी सकाळी दहापासून शहरात उमटले. एक गट आक्रमक झाला, नंतर दोन विभिन्न गटाच्या वादातून पुन्हा तोडफोड, जाळपोळीचे प्रकार सुरू झाल्याने पोलिस प्रशासनाने संचारबंदी लागू करून स्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. 

शहरात पाच जूनला वृध्द व्यावसायिकास पेटविण्याचा प्रयत्न ग्राहकाने केला. त्याचवेळी त्या ग्राहकासदेखील जमावाने मारहाण केली. या घटनेत व्यावसायीक आणि ग्राहक दोघे गंभीर जखमी झाले. नातेवाईकांनी वृध्द व्यावसायिकास मुंबई येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ही माहिती नातेवाईकांना येथे मिळाली. त्यातून काही नातेवाईकांचा संयम सुटला व वादाला पुन्हा सुरवात झाली. 

शहरात शास्त्री मार्केट परिसरात दगडफेक व दुकानांची तोडफोड सुरू झाली. वातावरण चिघळले. स्थिती नियंञणात आणण्यासाठी पोलिसांनी दहा अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिस प्रशासनाने संचारबंदी लागू करत स्थितीवर नियंत्रण मिळविले. तसेच समाजकंटकांचे धरपकड सत्र सुरू केले आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून दहा ते बारा संशयितांसह त्या ग्राहकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
जनतेच्या परिक्षेत भाजप 'ढ' ठरली: संजय राऊत
नवी मुंबईत रिक्षा चालकांकडून बस चालक व वाहकाला मारहाण
शिवराजसिंह चौहानांचे उपोषण सुरु; शेतकऱ्यांशी चर्चेस तयार
धुळे: पावसामुळे तामसवाडीजवळ रस्ता गेला वाहून
पुणे: मोदी फेस्टच्या कार्यक्रमाला खासदार, आमदारांची दांडी
लष्कराने घुसखोरीचा कट उधळला; 5 दहशतवादी ठार
महात्मा गांधी 'चतुर बनिया' होते: अमित शहा
धुळे: कर्जमाफीच्या वाऱ्यामुळे शेतकरी सभासदांनी थकविले 134 कोटी
बाईला बाई होण्यासाठी कर भरावा लागणार?
#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल​
 

Web Title: Nandurbar news curfew in nandurbar