नंदुरबार जिल्ह्यात गारठून दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

नंदुरबार - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरला असून, किमान तापमान 14 अंशांपेक्षा खाली आले आहे. त्यामुळे दोघांचा थंडीने गारठल्यामुळे मृत्यू झाला. काल (25 डिसेंबर) रात्री उशिरा या घटना घडल्या. यासंदर्भात पोलिसांत नोंद झाली आहे.

तलवाडे (ता. नंदुरबार) येथे इंद्रीहट्टी रस्त्यावरील पडीक व्यायामशाळेजवळ राजू दाजमल भिल (वय 27, रा. तिलाली) याचा मृतदेह आढळून आला. त्याचा थंडीत गारठल्याने मृत्यू झाला. याबाबत यमुनाबाई भिल यांनी तालुका पोलिस ठाण्यात नोंद केली. तसेच चौपाळे (ता. नंदुरबार) येथील शिवारात विमल हौसिंग सोसायटीजवळ देवसिंग वेडू ठाकरे (वय 75, रा. नंदुरबार) यांचा मृतदेह आढळला. त्यांचाही थंडीमुळे गारठून मृत्यू झाला. याबाबत राजेंद्र ठाकरे यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार दोन्हीही घटनांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: nandurbar news two death by cold