esakal | नंदुरबारमध्ये दुभंगलेल्या ६५ कुटुंबांचा संसार पून्हा जुळला!
sakal

बोलून बातमी शोधा

नंदुरबारमध्ये दुभंगलेल्या ६५ कुटुंबांचा संसार पून्हा जुळला!

नंदुरबारमध्ये दुभंगलेल्या ६५ कुटुंबांचा संसार पून्हा जुळला!

sakal_logo
By
धनराज माळी


नंदुरबार : पुरुषांकडून महिलांवर होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासामुळे कौटुंबिक कलहावर पडदा टाकून संसार जोडण्याचे काम नंदुरबार जिल्हा पोलिस (Nandurbar Police)दलाचा महिला सहाय्यता कक्ष (Women's Support Room) करत आहे. याअंतर्गत गेल्या सहा महिन्यांत या कक्षाकडे १७० अर्ज दाखल झाले आहेत. कौटुंबिक कलह (Family disputes) सामोपचाराने तसेच समुपदेशनाने सुरळीत व सुव्यवस्थित सुरू करण्याचे काम महिला सहाय्य कक्षाने केले आहे. आतापर्यंत ६५ कुटुंबांचे दुभंगलेले संसार या महिला कक्षाने उभे केले आहेत.

(nandurbar police department womens support room family matched)

हेही वाचा: वाढदिवसाची रात्र ठरली अखेरची रात्र..तरुणाचा निर्घृण खून


महिलांवरील अन्याय आणि विशेषत: कौटुंबिक कलह निर्मूलनासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलिस मुख्यालयांतर्गत असे कक्ष कार्यरत आहेत. याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातही पोलिस अधीक्षक कार्यालयात महिला सहाय्यता कक्ष कार्यरत आहे. कक्षातील अधिकारी व अंमलदार हे तक्रारदार महिला व तिचे सासरकडील कुटुंब अशा दोघांचे समुपदेशन करून त्यांचा संसार सुरळीत चालविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. पीडित महिलांना तत्काळ पोलिस मदत मिळावी म्हणून १०९१ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. कक्षात महिलांविषयक कौटुंबिक तक्रारीचे निवारण करण्यात येते. विशेषत: लॉकडाउनमध्ये तसेच बेरोजगारीमुळे सर्वच जण घरात असल्याने व त्यात आर्थिक अडचणींमुळे काही घरांत पती-पत्नी, सासू-सून, मुलगा-वडील अशा अनेक नात्यांमध्ये तक्रारी व भांडणे होऊन कौटुंबिक कलह वाढले होते. कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे घरातील कौटुंबिक कलह अजून वाढल्याने सुमारे १७० तक्रारी या कक्षाकडे प्राप्त झाल्या.

हेही वाचा: अहिराणी कार्टून क्लीपची सोशल मिडीयात धूम..!


कौटुंबिक कलहातून पतीने घराबाहेर काढलेल्या महिलांना कक्षातील अधिकारी व अमलदार यांनी आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने घरगुती गृहोद्योग सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केल्याने काही तक्रारदार महिलांना स्वत:चा गृहोद्योग सुरू केला आहे. आलेल्या तक्रारी मिटवून पुन्हा सुरळीत संसार व्हावा, यासाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार व पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यता कक्षाच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नयना देवरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भगवान धात्रक, महिला कर्मचारी प्रमिला वळवी, विजया वोराडे, प्रीती गावित, महिला अरुणा मावची हे प्रयत्नशील असतात.

loading image