नरेंद्र मोदी, प्रियांका गांधींच्या पिचकाऱ्यांची खास क्रेझ

priyanka
priyanka

नाशिक - होळी... आनंद आणि उत्साहाचा सण. महाराष्ट्राची परंपरा सांगणाऱ्या या सणात अवघे कुटुंब सहभागी होते. एक दिवसावर आलेल्या या सणाला यंदा लोकसभा निवडणुकीची किनार लाभली आहे. होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी अशा तिन्ही प्रमुख दिवशी पक्ष वेगवेगळे फंडे वापरून प्रचारास प्राधान्य देतील यात शंका नाही. या प्रमुख सणांसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असून, यंदा बाजारात नरेंद्र मोदी, प्रियांका गांधी, राहुल गांधी, बाळासाहेब ठाकरे यांसारख्या नेत्यांच्या पिचकाऱ्यांची वेगळी क्रेझ आहे. निवडणुकीचा फीव्हर या निमित्ताने पावलोपावली जाणवत आहे. 

दर वर्षी बाजारपेठेत धूम असणाऱ्या स्पायडरमॅन, डोरेमॉन, छोटा भीम, सुपरमॅन, पब्जी याचबरोबर हॅन्डपंप या पिचकाऱ्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. होळीसाठी शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी होत आहे. शहरातील मेन रोड, शालिमार, रविवार कारंजा या मुख्य ठिकाणी रंग व पिचकाऱ्यांच्या खरेदीसाठी गर्दी दिसून येते. 

पिचकाऱ्यांवर बॉलिवूडचेही रंग 
सण-उत्सव कोणताही असो, आपल्या आवडत्या अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीच्या वस्तू घ्यायला प्रत्येकालाच आवडते. विशेषतः युवा पिढी यात आघाडीवर असते. यंदा राजकीय नेत्यांच्या जोडीला विविध सिनेमांच्याही पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने पॅडमॅन, बाहुबली, एक था टायगर या पिचकाऱ्यांना चांगली मागणी आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून रंग व पिचकाऱ्या घेणाऱ्या ग्राहकांची संख्या चांगलीच वाढली आहे. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ग्राहकांकडून आपल्या आवडत्या राजकीय नेत्याच्या पिचकाऱ्यांची मागणी अधिक होत आहे. 
- कैलास तलरेजा, शिवम नॉव्हेल्टी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com