नाशिक - निष्काळजीपणामुळे विद्युत अपघाताचे वर्षभरात ८८ बळी

खंडू मोरे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

खामखेडा (नाशिक) - विजेचे आपल्या जीवनात अतिशय महत्वाचे स्थान आहे. सर्वसामान्य लोकांचे जनजीवन सुरक्षित रहावे यासाठी विजेचा सुरक्षितरीत्या वापर होणे अत्यंत आवश्यक आहे. तथापि विद्युत उपकरणांची योग्यरित्या हाताळणी न केल्यामुळे विद्युत अपघाताने जिवीतहानी होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे १५०० माणसे विद्युत अपघाताने दगावतात होतात. तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळुन देखिल कर्मचार्यांच्या अतिरेकी उत्सहामुळे अपघात घडल्याने नाशिक विभागातुन गेल्या वर्षी ४ कर्मचारी व ८४ सामान्य नागरीकांना जिव गमवावा लागण्याच्या घटनावरून दिसुन येते.

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे स्वयंचलित व अचूक विद्युत सुरक्षा यंत्रणा निर्माण झाल्या आहेत.तरीसुद्धा विद्युत उपकरणे सुरक्षितपणे हाताळण्याचे अज्ञान,बेफिकीरी,फाजील आत्मविश्वास व अतिउत्साह ह्या मानवी घटककाच्या चुकामुळे नाशिक जिल्ह्यातील माघील वर्षभरात ४ कर्मचाऱ्यांना तर ८४ सामान्य नागरिकांना विजेच्या अपघातात जिव गमवावा लागला आहे.तर ७३ जनावरे देखील विजेच्या अपघातात दगावली आहेत.

विद्युत पर्यवेक्षकाकडून वीजसंच मांडणीची उभारणी व देखभाल न करणे,हलक्या दर्जाची वीज उपकरणे वापरणे,कमी खर्चात वीजसंच मांडणी उभारण्याचा मोह व अपुरी चुकीची देखभाल व दुरुस्ती करणे हे कर्मचार्यांच्या अपघातास सर्वसाधारपणे कारणीभुत ठरनारी घटक आहेत.

मात्र  माघिल वर्षभरात ८४ सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागल्याने विद्युत सुरक्षिततेबाबत सर्वसामान्य जनतेत जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.विद्युत सुरक्षिततेबाबत जागरुकता निर्माण करणे हे महावितरनचे काम असुन विद्युत सुरक्षा सप्ताहात हे सोपस्कार पार पाडले जात असल्याचे चित्र दिसून येते.

ग्रामीण भागात सामान्य नागरिकांच्या अपघातांचे प्रमाण जास्त दिसून येते.विजेची उपकरणे हाताळणे,विजेची गळती,वीजचोरी करतांना,शॉर्ट सर्किट ,दुर्लक्ष केल्याने,निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात घडून सामान्य नागरिकांना देखील जीव गमवावा लागला आहे.त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या मालकीच्या तशेच मोकाट जनावरांचा देखील अपघात घडून मोठ्या प्रमाणावर जनावरे दगावली आहेत.

विजेच्या बाबतीत जागरुक होत नाही, तोपर्यंत आपण होणारी हानी थांबवू शकत नाही.विद्युतशक्ती संदर्भात काम करणारे व्यावसायिक,वीज वापरणारे व त्यांच्या संपर्कात जाणारे,अशा प्रत्येकाला विजेचे गांभीर्य कळावे आणि होणारे अपघात टाळावे यासाठी महावितरणने या बाबतीत सर्व स्तरांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.

अपघातात बळी पडलेल्या सामान्य नागरिकांची संख्या.
वायर तुटणे -९, विजेची उपकरणे हाताळणे-१८, विजेची गळती-४, वीजचोरी करतांना-१४, शॉर्ट सर्किट-१, दुर्लक्ष केल्याने-०, निष्काळजीपणामुळे-६.

अपघातात बळीगेलेली जनावरांची संख्या.
वायर तुटणे -३५ विजेची उपकरणे हाताळणे-१८, विजेची गळती-२६, वीजचोरी करतांना-१, शॉर्ट सर्किट-१, दुर्लक्ष  केल्याने-०, निष्काळजीपणामुळे-४.अन्य ४

Web Title: nashik - 88 people have died due to negligence during the year