नाशिक (अंबासन) - अवैध दारू निर्मिती व विक्री केंद्रावर छापे

दीपक खैरनार
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

नाशिक (अंबासन) - मोसमसह परिसरातील अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारू भट्टीवर जायखेडा पोलिसांनी आपल्या कार्यक्षेतातील गावठी दारू निर्मिती व विक्री केंद्रावर छापे टाकून हातभट्ट्या उध्वस्त केल्या. या कारवाईत शेकडो लिटर रसायन नष्ट करण्यात आले. पोलिसांनी पहाटेपासून धडक कारवाई केली. गावठी हातभट्टी केंद्रावर छापेमारी करून गावठी दारू नष्ट केल्याने अवैधरित्या गावठी दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या उपस्थितीत पाच हातभट्टी निर्मीती केंद्रावर छापा टाकून रसायन नष्ट करण्यात आले. तसेच बॅरेल जप्त करण्यात आले आहेत. 

दसवेल, तेलदरा, वाघंबा, आसखेडा, तुगंण दिगर व तांदूळवाडी येथे ही छापेमारीची कारवाई करीत ५०० लिटरहून अधिक अवैध गावठी दारू व रसायन नष्ट करण्यात आल्याचे व २५ ते ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी अशोक माळी (रा.दसवेल), जिजाबाई साहेबराव सोनवणे (रा.तेलदरा), वाधु महादू सूर्यवंशी (रा.वाघंबा), तुळशीराम महाले(रा.वाघंबा) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध घेतला जात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी सांगितले. पाचही गावांच्या ठिकठिकाणी असलेल्या बेकायदेशीर हातभट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या आहेत. त्यातील रसायन ओतून टाकले असून जप्त करण्यात आलेले बॅरेल फोडून नष्ट न करता स्वच्छ भारत अभियानाला हातभार म्हणून हे बॅरेल कचराकुंड्या म्हणून वापरण्यासाठी नागरिकांना मोफत वाटण्याचा अभिनव उपक्रम जायखेडा पोलिसांकडून राबविला जाणार आहे. मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम कोळी, पोलीस हवालदार अंबादास थैल, देविदास माळी, राजू गायकवाड, दशरथ गायकवाड, निंबा खैरनार, राजेंद्र सावळे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कामगारी बजावली आहे.

आगामी काळातही अवैध धंद्यावर अशाच स्वरुपात कडक कारवाई सुरु राहणार असून जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कोणाचीही गय केली जाणार नाही.
गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक जायखेडा 

Web Title: Nashik (Amasasan) - Impressions on illegal liquor manufacturing and sales centers