तबलावादक प्रमोद भडकमकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

नाशिक - पंडीत जितेंद्र अभिषेकी, सुरेश तळवळकर,राजा काळे, रघुनंदन पणशीकर यांना साथसंगीत करणारे प्रसिध्द तबलावादक, एसएमआरके महाविद्यालयातील प्रा. प्रमोद कमलाकर भडकमकर (वय 53) यांचे आज हदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने सकाळी निधन झाले. सर्वांशी आपुलकीने बोलणारा,मनमिळावू आणि दिलखुलास व्यक्तीमत्व असलेल्या प्रमोद यांच्या निधनाचे अचानक आलेल्या वृत्ताने संगीत,सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली. त्यांच्या मागे तीन बहिणी,पत्नी,मुलगी तबलावादक वैष्णवी असा परिवार आहे.

प्रमोद हे सकाळी दररोज चालणे,व्यायाम करण्यासाठी जात असत. आजही सकाळी नेहमीप्रमाणे चालणे व व्यायाम करून घरी आल्यानंतर ते आपल्या सोफ्यावर बसले. त्यानंतर काहीवेळातच हदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते खाली कोसळले. पत्नी मुलगी यांनी शेजारच्याच्या मदतीने त्यांना गंगापूर रोडवरील मॅग्नम हॉस्पिटलमध्ये नेले मात्र दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. प्रमोद यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे एसएमआरके महाविद्यालयातील सहकारी प्रा.अविराज तायडे, प्रसिध्द तबला वादक नितीन वारे,सुभाष दसककर,किर्ती कलामंदीराच्या रेखा नाडगौडा,सुनिल देशपांडे,गिरीष पांडे, ऍड.आपटे, संस्कृती नाशिक या संस्थेचे, नगरसेवक शाहू खैरे,नंदन दिक्षित,मकरंद हिंगणे आदींनी हॉस्पिटलमध्ये धाव घेत चौकशी केली मात्र प्रमोदच्या निधनाचे वृत्त कळताच या सर्वांनाच अश्रृ अनावर झाले. दोन दिवसांपूर्वीच प्रमोद यांचे अध्यात्मिक गुरु पारनेरकर महाराज यांच्या पारनेर येथे झालेल्या संगीत महोत्सवात त्याने पद्मश्री मौनुद्दीन खान (जयपूर) यांना नुकत्याच एका कार्यक्रमात साथसंगीत केली होती. पवार तबला अकादमी,वसंत उत्सव,स्वरशेला पावसाचा, सर मो.स.गोसावी संगीत महोत्सव, स्वराधिराज,षडज्‌ गंधार नाशिक,अंतरंग यासारख्या संगीत सोहळ्यात प्रमोद यांनी नावाजलेल्या कलावंताना तबल्याची साथसंगत केली होती.

Web Title: nashik breakling news nashik news Pramod Bhadkamkar death arts tabla player