दत्तक खेड्यातील हजाराहून अधिक कामे बासनात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नाशिक - नाशिक जिल्ह्यात 20 आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावातील 1 हजार 336 पैकी 38 कामे पूर्ण झालीत. 93 गावांत काम सुरू आहे. ग्रामविकास विभागाच्या थंड कारभारामुळे 1 हजार 205 कामे बासनात आहेत. आदर्श गावांच्या कामांचे आराखडे तयार करण्यासाठी पन्नास हजारांच्या उधळपट्टीनंतरही लालफितीचा कारभार थांबायला तयार नाही.

केंद्र सरकारच्या संसद आदर्श ग्रामच्या धर्तीवर राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना सुरू झाली. जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास आराखड्यानुसार जिल्ह्यातील 18 आणि मुंबईतील 2 आमदारांनी कामे सुचवली. मात्र, सुचवलेल्या कामांसाठी प्रशासकीय यंत्रणेने पाठपुरावा करायचा असतो, याचा नेमका विसर जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला पडला आहे. कामांच्या आराखडापूर्ततेनंतर जिल्हा परिषदेच्या यंत्रणेकडून गटविकास अधिकारी संबंधित गावांसाठी निश्‍चित केले. मात्र, कागदीघोडे नाचवण्यात पटाईत असलेल्या ग्रामविकासच्या यंत्रणेच्या पाठपुराव्याअभावी 91 टक्के कामे थंडावली आहेत.

Web Title: Nashik District Adopt Village MLA Work