जिल्हा बॅंकेमुळे ‘वसाका’चा गळीत लांबला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

देवळा - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वेळकाढूपणामुळे वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचा या वर्षी गळीत हंगाम सुरू करण्यात कारखाना व्यवस्थापनास अडचण आली. असे असले तरी पुढील गळीत हंगाम वेळेवर व पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी प्राधिकृत मंडळ कटिबद्ध आहे. यासाठी कारखान्याशी संलग्न सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ‘वसाका’चे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या प्राप्त परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सभासद व कामगारांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर आज वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या वेळी अध्यक्षस्थानवरून श्री.

देवळा - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वेळकाढूपणामुळे वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचा या वर्षी गळीत हंगाम सुरू करण्यात कारखाना व्यवस्थापनास अडचण आली. असे असले तरी पुढील गळीत हंगाम वेळेवर व पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी प्राधिकृत मंडळ कटिबद्ध आहे. यासाठी कारखान्याशी संलग्न सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ‘वसाका’चे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या प्राप्त परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सभासद व कामगारांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर आज वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या वेळी अध्यक्षस्थानवरून श्री. आहेर बोलत होते. 

वसाकाच्या प्राधिकृत मंडळाने चालू गळीत हंगाम सुरू करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले; परंतु जिल्हा बॅंकेने कारखान्याला कर्ज देण्यासाठी दिरंगाई केली. मात्र पुढील गळीत हंगाम यशस्वी व पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी प्राधिकृत मंडळ आतापासून कामाला लागले आहे. राज्य सहकारी बॅंक तसेच मुंबई जिल्हा बॅंकेकडे नव्याने प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे सर्व सभासद व कामगारांनी निश्‍चिंत राहावे. जिल्हा बॅंकेने वसाकाला अल्पमुदतीचे दोन कोटी रुपये कर्ज मंजूर केले असून, त्याचे रूपांतर मध्यम मुदतीच्या कर्जात करण्यासाठी जिल्हा बॅंक संचालक मंडळाचे सभासद व कामगाराचे शिष्टमंडळ लवकरच भेट घेणार आहे. तसेच कामगारांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही आमदार डॉ. राहुल आहेर यांनी या वेळी दिली. प्राधिकृत मंडळाने सर्वांना विश्‍वासात घेऊन कारखाना, वीजनिर्मिती प्रकल्प तसेच आसवनी प्रकल्प खासगी व्यक्ती अथवा कंपनीला चालविण्यास देण्यास प्रयत्न करावेत, अशी मागणी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष संतोष मोरे, संचालक वसंत निकम, ज्येष्ठ सभासद संतोष सूर्यवंशी, शिवाजी सोनवणे, कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, सरचिटणीस रवींद्र सावकार, व्यंकट पवार यांनी या वेळी केली. कार्यकारी संचालक बी. डी. देसले यांनी प्रास्ताविक केले. प्राधिकृत अधिकारी केदा आहेर, धनंजय पवार, अभिमन पवार, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, नितीन पवार, सहाय्यक निबंधक तथा प्राधिकृत अधिकारी संजय गिते, नंदकुमार खैरनार, माजी संचालक शिवाजी हिरे, अण्णा पाटील शेवाळे, कळवण नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार, माजी सभापती आत्माराम भामरे, राजेंद्र भामरे, विलास निकम आदींसह सभासद व कामगार हजर होते.

Web Title: Nashik District co-op bank