नाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी 

दीपक खैरनार
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

अंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व  माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शासनाच्या १४ नोव्हेंबर २०१७च्या शासन निर्णयानुसार सामाईक सेवाज्येष्ठता यादी तयार करून यादिप्रमाणे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक या पदोन्नती द्याव्यात असे आदेश जिल्ह्यातील संस्थाचालकांना द्यावेत. अशी मागणी करण्यात आली. 

मागणीसाठी समितीकडून यापूर्वी देखील शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांना निवेदने देण्यात आली होती. मात्र कार्यवाही होत नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला. काल शिक्षकांनी निर्वाणीचा इशारा देऊन कारवाईची मागणी केली. त्यानंतर शिक्षण सभापती यतीन पगार यांच्या दालनात बैठक झाली. यात सभापती पगार यांच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी लवकरच कारवाई करण्यात येईल असे सांगितले. यावेळी संघटनेच्या वतीने निवेदनासोबत महाराष्ट्रातील अन्य जिल्हयातील शिक्षणाधिकाऱ्यांनी शासन निर्णयानुसार पदोन्नती देण्याबाबत काढलेल्या आदेशांच्या प्रती व सर्व शासन निर्णयाच्या प्रती उभयतांना सादर केल्या. यावर लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे शिक्षण सभापती व शिक्षणाधिरी यांनी सांगितले. 

यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. सुधीर जाधव व देविदास निकम उपस्थित होते. त्यांनी देखिल शासन निर्णयाची अंमलबजावणी करणेबाबत आग्रह धरला. समन्वय समितीचे राज्य समन्वयक भास्करराव काळे, नाशिक जिल्हा अध्यक्ष दीपक जाधव, जिल्हा प्रतिनिधी नंदू घोटेकर, लहू कोर, सुदाम कवडे, कलाव्हिजन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय सांगळे, दत्ता उटावळे, संजय  पगार, उमेश पगार, बी. के. निफाडे, रामू बच्छाव, माणिक गिते, हेमराज गोसावी, मनिष बोरसे, एस.ई.देवरे, बी.एन.निरगुडे, एम.बी. कापडणीस, पोपट मुरकुटे, श्रीमती जे.सी. खैरनार, श्रीमती विद्या पगार, श्रीमती शोभा आरोटे, श्रीमती मुंदाळकर, देवळा तालुका टी डी एफ अध्यक्ष मनोज शिरसाठ, सुरेश मोरे, बाळासाहेब सोमासे, बाबासाहेब कलकत्ते, ए. के.जाधव, सोपान पवार, आर.एस.भामरे, आर.एस. बच्छाव, बी आर.मोरे, बाळासाहेब कदम आदींसह शेकडो शिक्षक उपस्थित होते. निवेदन देण्यापूर्वी जिल्हाभरातून आलेल्या शिक्षकांची सभा घेण्यात आली. या सभेत सर्वांनी एकजुटीने या शासन निर्णयाची अंमबजावणी करण्यासाठी तीव्र संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Web Title: Nashik District Graduate D. Ed. Demand for the promotion of the coordination committee