नाशिक जिल्ह्यात टोल फ्री रस्ते

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

नाशिक/कळवण - नाशिक जिल्ह्यातील डाळिंब, कांदा, द्राक्ष या प्रमुख पिकांच्या उत्पादनाबरोबरच शेती प्रक्रिया उद्योगांचे उत्पादन देशातील प्रमुख बाजारपेठांपर्यंत वेळेत पोचविण्यासाठी जिल्हा दळणवळणाच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी "गुणवत्तापूर्ण काम करीत दहा वर्षे सुदृढ राहा' असे अघोषित नामधारण असलेल्या रस्ते विकास कार्यक्रमांचा भाग असलेल्या "हायब्रिड ऍन्युटी' उपक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने टोल फ्री तीनपदरी तीन रस्त्यांच्या निविदा मंजूर केल्या आहेत, तर दोन रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेत आहेत.

उद्देश
औद्योगिक, कृषी यांसह पर्यटन व्यवसायाला चालना देणे, शहर, जिल्हा, राज्य महामार्ग एकमेकांना जोडून दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देणे, आदिवासी क्षेत्र, एकमार्गी वाहतूक, भूसंपादन, पुनर्वसन हे प्रश्‍न बाजूला सारून रस्त्यांचा विकास.

हायब्रिड ऍन्युटीत काय होणार
दोन वर्षांत रस्ता तयार होणार, निविदा मंजुरीनंतर पाच महिन्यांच्या आत कामकाजास सुरवात, निविदा घेणाऱ्याची रस्त्याची स्थिती 10 वर्षे सुस्थिती असेल याची जबाबदारी, होणारा खर्च शासन टप्प्याटप्प्याने देणार.

Web Title: nashik district toll free road