नाशिककर गारठले; पारा 8.5 अंशांवर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

नाशिक : नाशिकच्या किमान तापमानामध्ये तब्बल दोन अंशांनी घसरण होऊन आज 8.5 अंश सेल्सियस नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमात प्रथमच्या 9 अंश सेल्सियसच्या खाली नाशिकचा पारा घसरला तर, जिल्ह्यातील निफाड येथे किमान पारा 7.2 अंश सेल्सियस नोंदला गेला आहे. किमान तापमानात झालेल्या या घसरणीमुळे नाशिककर पुरते गारठले आहेत. तर कमाल पाराही 25.4 अंश सेल्सियस नोंदला गेल्या असून दिवसाच्या वातावरणातही गारवा होता. 

गेल्या आठवडाभरापासून नाशिकच्या किमान तापमान सातत्याने 10 अंश सेल्सियसपेक्षा कमी राहते आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये वाढत्या थंडीने चांगलीच हुडहुडी भरली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी किमान तापमान 10 अंशपेक्षा कमी होते आणि त्यातच बोचरे गार वारेही वाहत होते. तर, काल 10.5 अंश सेल्सियस किमान तापमान नोंदले गेल्यानंतर आज त्यात तब्बल 2 अंशांनी घसरण झाली आणि 8.5 अंश सेल्सियसपर्यंत पारा घसरला. त्याचा परिणाम दिवसाही दिसून आला. कमाल तापमान 25.4 अंश सेल्सियस असतानाही दिवसा वातावरणातील गारव्यामुळे थंडीचा कडाका कायम होता. तर सायंकाळी 5 वाजेपासूनच बोचऱ्या गार वाऱ्यामुळे थंडीने अनेकांना हुडहुडी भरविली. 

दरम्यान, नाशिकच्या यंदाच्या मोसमातील आजचे 8.5 अंश सेल्सियस किमान तापमान हे निचांकी ठरले आहे. तर जिल्ह्यातील निफाड येथे आज किमान तापमानाचा पारा 7.2 अंश सेल्सियस नोंदला गेला आहे. नाशिकसह महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. उत्तर भारतामध्ये हिमवर्षावामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट आल्याचे सांगितले जाते. उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव 10 अंश, जळगाव 8.4, अहमदनगर 8.7 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली आहे तर राज्यातील निचांकी तापमानाची नोंद पुणे येथे 8.3 अंश सेल्सियस नोंदले गेले आहे. येत्या काही दिवसात किमान तापमानात घट होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Web Title: Nashik frozen ; Mercury at 8.5 degrees